Pune Porsche car Accident : पुणे पोर्शे कार प्रकरणाचं मुंबई कनेक्शन समोर, ब्लक रिपोर्ट फेरफार प्रकरणी दोघांना मुंबईतून अटक
पुणे पोलिसांनी मुंबईतून आता दोघांना अटक केली आहे. ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात या दोघांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे.
पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा सखोल तपास करण्यात येत आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येत आहे. त्यातच या प्रकरणात विशाल अग्रवालचा मुलगा याचे ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता या ब्लड रिपोर्टचं मुंबई कनेक्शन पुढे आलं आहे. पुणे पोलिसांनी मुंबईतून आता दोघांना अटक केली आहे. ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात या दोघांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर पुणे क्राईम ब्रॅंचने दोघांना थेट अटक केली आहे. अशपाक मकानदार, अमर गायकवाड अशी दोघांची नावे आहेत. या दोघांची आता पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचकडून सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
पुण्यातील पोर्शे कार अपघाताचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे. त्यात सोड नवनवे खुलासे समोर येत आहे. यातील सगळ्यात धक्कादायक म्हणजे विशाल अग्रवालच्या मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले होते. त्यानंतर मोठी खळबळ उडाल होती. अवध्या तीन लाखांसाठी ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर थेट ससून रुग्णालयाचा ढिसाळ कारभार समोर आला होता. या प्रकरणी डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या तीन लाखांसाठी त्यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलं होतं. विशाल अग्रवाल यांच्या मुलासाठी त्याची आई शिवानी अग्रवाल यांच्या रक्ताचे नमुने वापरण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर विशाल अग्रवाल याच्या मुलासोबत गाडीत असलेल्या दोन मुलांचेदेखील ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याचं समोर आलं होतं. भर रात्री ससूनमध्ये दोघेजण गाडीतून येऊन तावरेंच्या सोबत काम करणाऱ्या हळनोर आणि शिपाई सोबत रक्तासंबंधित डिल झाली होती. त्यानंतर या तिन्ही मुलांच्या रक्तगटाशी मिळते जुळते रक्तगट असलेले लोक शोधण्यात आले आणि त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असल्याचंही समोर आलं. त्यानंतर आता गाडीतून आलेले दोघं आणि रक्त देणाऱ्या तिघांचा सध्या पुणे पोलीस शोध घेत आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिस खोलात जाऊन करताना दिसत आहे. या प्रकरणाचं आता मुंबई कनेक्शन समोर आलं आहे. पुढे कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असेल.
इतर महत्वाची बातमी-