Pune Accident : अमृता फडणवीसांच्या प्रतिक्रियेने लक्ष वेधलं, म्हणाल्या, शेम ऑन Juvenile Justice Board!
Pune Car Accident News : देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुण्यातील अपघातप्रकरणी ट्वीट करत संवेदना व्यक्त केल्या आहेत. दोषी आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे असंही त्या म्हणाल्यात.
पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग (Pune Car Accident News) प्रकरणात गृहमंत्री फडणवीसांनी बालन्याय मंडळाच्या आदेशांवर आक्षेप घेतलाय. बालन्याय मंडळाचे आदेश धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहेत असं फडणवीस म्हणाले. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुण्यातील अपघातप्रकरणी ट्वीट करत संवेदना व्यक्त केल्या आहेत. दोषी आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे असंही त्या म्हणाल्यात.
हातच्या फोडाप्रमाणे जपत, वाढवलेला पोटचा गोळा जगातून गेल्यामुळे अनिश अवधियाच्या आईचा आणि अश्विनी कोष्टाच्या नातेवाईकांचा आक्रोश आणि संताप आहे. श्रीमंतीची नशा डोक्यात असताना, बेफाम दारू पिऊन, बेदरकारपणे कार चालवत आरोपीने या दोघांचा चिरडून जीव घेतलाय. या प्रकरणी अमृता फडणवीस म्हणाल्या, अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्ठ यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहे. दोषी आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. Shame on Juvenile Justice Board!
My heartfelt condolences to families of Aneesh Awadhiya and Ashwini Kostha .
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 22, 2024
The culprit #VedantAgarwal should be hard punished !
Shame on Juvenile Justice Board !#Pune
बालन्याय मंडळाच्या आदेशांवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात गृहमंत्री फडणवीसांनी बालन्याय मंडळाच्या आदेशांवर आश्चर्य व्यक्त केलंय.. बालन्याय मंडळाचे आदेश धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहेत असं फडणवीस म्हणाले. आरोपी मुलगा अल्पवयीन असला तरी निर्भया प्रकरणानंतर कोर्टाने दिलेल्या आदेशांनुसार सज्ञान व्यक्तीप्रमाणेच त्याच्यावर कारवाई करावी यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. बालहक्क मंडळात फेरविचार याचिका दाखल आहे. त्याचा निकाल आल्यानंतर पुढील कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला जाईल असं फडणवीस म्हणाले. पुणे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून तातडीने कलम 304 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमके कोणते आदेश दिलेत?
- पबचं लायसन्स ज्यांना मिळालंय त्यांच्याकडून नियमांचं पालन होतंय का याची कसून तपासणी होणार
- नियमांचं उल्लंघन झालेलं असल्यास कडक कारवाई होणार
- वेळेच्या नियमाबाबत पोलिसांकडून अहवाल येणार
- नवीन लायसन्स रहिवासी भागांमध्ये देण्यात येणार नाहीत, याची दक्षता घेणार
- पोलिस, महापालिका, उत्पादन शुल्क विभागाने नियमांचं पालन होतंय का यावर काटेकोर नजर ठेवावी
- ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह मोहीम मोठ्या प्रमाणावर वाढवणार
हे ही वाचा :