एक्स्प्लोर

Pune Porsche Car Accident : स्वत:च बिल्डरच्या पाकिटावर काम करणारा काय कारवाई करणार; थेट पोलिस आयुक्तांवर आरोप करत धंगेकरांकडून मुंढवा पोलिस स्टेशनचा 'पंचनामा'

Pune Porsche Car Accident : धंगेकर यांनी ट्विट करत मुंढवा पोलिस स्टेशनच्या कारभाराचे वाभाडे काढतानाच थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराने पोर्शे कारने चिरडून ठार केलेल्या (Pune Porsche Car Accident) दोन आयटी इंजिनिअर्सना न्याय मिळवून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. धंगेकर यांनी पुणे पोलिस आयुक्त कोणीही दोषी आहे असे मानत नाहीत कारण बिल्डर्सच्या पैशावर काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.  

अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही

धंगेकर यांनी ट्विट करत मुंढवा पोलिस स्टेशनच्या कारभाराचे वाभाडे काढतानाच थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार...? 

असो, आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे. दिवस 1 ला - मुंढवा पोलीस स्टेशन - हे पोलीस स्टेशन अवघे ३ कर्मचारी चालवतात.त्यापैकी निलेश पालवे ,काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स ,हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात. सोबत एक फोटो जोडत आहे ज्यात हे वसुली कॉन्स्टेबल #वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करतांना दिसून येत आहेत.

आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणांस विनंती आहे की,पुणे बिघडविणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची यांची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा ,अन्यथा 48 तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील. पुन्हा भेटुयात नव्या पोलीस स्टेशनचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन. जय हिंद ,जय पुणेकर..!

पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोल

धंगेकर यांनी येरवडा पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर सुद्धा ठिय्या आंदोलन केले होते. ते म्हणाले होते की, "या प्रकरणी दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पहिली एफआयआर चुकीची होती, म्हणून दुसरी दाखल करण्यात आली. ज्या पोलीस अधिकाऱ्याने पहिली चुकीची एफआयआर नोंदवली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने झाला पाहिजे, आणि जे मृत्यूमुखी पडले आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही धंगेकर यांनी केली आहे. ते म्हणाले की, पोलीस आयुक्तांना सर्व काही माहित आहे; त्यांनी राजीनामा द्यावा. पुण्यातील लोक रस्त्यावर उतरले आहेत हे त्यांना कळावे म्हणून मी इथं आलो आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9:00AM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRohit Sharma : T 20 विश्वचषकातून निवृत्तीवेळी रोहित शर्माने सांगितल्या आठवणीTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 June 2024 : ABP MajhaAmravati T 20 World Cup Celebration : T 20 विश्वचषक विजयाचा अमरावतीत जल्लोष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
Hardik Pandya: त्या एका गोष्टीमुळे व्हिलन ठरेलला हार्दिक पांड्या अखेरच्या षटकात हिरो ठरला, भरमैदानात रोहित शर्माने कुंफू पांड्याचा गालगुच्चा घेतला
त्या एका गोष्टीमुळे व्हिलन ठरेलला हार्दिक पांड्या अखेरच्या षटकात हिरो ठरला, भरमैदानात रोहित शर्माने कुंफू पांड्याचा गालगुच्चा घेतला
Hardik Pandya: भारत जिंकला अन् हार्दिकच्या डोळ्याला पाण्याची धार, मनात साचलेलं शल्य मोकळं केलं, म्हणाला, गेले सहा महिने....
भारत जिंकला अन् हार्दिकच्या डोळ्याला पाण्याची धार, मनात साचलेलं शल्य मोकळं केलं, म्हणाला, गेले सहा महिने....
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
Embed widget