Pune Porsche car Accident Live Update : मोठी बातमी : विशाल अग्रवालला 24 मेपर्यंत पोलीस कोठडी
पुण्यात भरधाव वेगात गाडी चालवून अगरवाल बिल्डरच्या मुलानं दोघांचा जीव घेतला. कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलीसांनी 185 कलम वाढवलं.
LIVE
Background
पुणे : पुण्यात भरधाव वेगात गाडी (Pune Porsche Car Accident) चालवून अगरवाल बिल्डरच्या मुलानं दोघांचा जीव घेतला. कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलीसांनी 185 कलम वाढवलं. या मुलाला पुन्हा जुवेनाईल कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. मुलाला 15 तासात जामीन मिळाल्याने संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणावरून सरकार आता अॅक्शन मोडवर आलंय.
असिम सरोदेकडून हस्तक्षेप याचिका दाखल
पुणे : सरकारी वकील असिम सरोदे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी दारुबंदी कायदा का लावला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पुणे अपघात प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी - नाशिक काँग्रेसची मागणी
नाशिक : पुणे येथील विमान नगर भागात एका अल्पवयीन मुलांकडून भरदा वेगाने मद्यप्राशन करून गाडी चालवण्यात आली व त्यामध्ये दोन निष्पा तरुण व तरुण यांना आपला प्राण गमवावा लागला. या घटनेनंतर गेल्या 48 तासांमध्ये तपास यंत्रणे करून ज्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे होता तसे न होता हा तपास करताना संशयास्पद घडामोडी झाल्या. आरोपी मुलास वाचवण्याकरता सत्ताधारी पक्षातील विशेष काही लोकप्रतिनिधी व तपास यंत्रणातले अधिकारी यांच्या संगनमताने आरोपी मुलाला वाचवण्याकरता व त्याला जामीन मिळण्याकरता मुद्दाम परिस्थिती निर्माण करण्यात आली. पुण्यातील पब मध्ये अल्पवयीन मुलाला मध्य प्राशन करून देण्यापासून ते त्या मुलाला जामीन मिळेपर्यंत सर्व यंत्रणा स्वतः करत होती तीच मुळात संशयास्पद होती. तक्रारी मध्ये बदल रक्त तपासणी रिपोर्ट मध्ये बदल अशा विविध घडामोडी संशयास्पद या प्रकरणात करण्यात आला. या अपघातामध्ये दोन होतकरू तरुण व तरुणी यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना ज्या पद्धतीने प्रकरण हाताळण्यात आलं त्याबाबत महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. अशा वेळेस या संपूर्ण प्रकाराची चौकशी एसआयटी मार्फत व्हावी ही मागणी आज नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मां. निवासी उपजिल्हाधिकारी श्री राजेंद्र वाघ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
Pune Porsche Car Accident विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी
पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील विशाल अग्रवाल याला तीन दिवसांची पोलीस कोठडी कोर्टाकडून देण्यात आली आहे.
सखोल चौकशीसाठी सात दिवसांची कोठडी मागितली...
पुणे :सरकारी वकील यांच्याकडून युक्तिवाद सुरू
ब्लॅक पब चे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणाच्या मेंबरशिप ने अल्पवयीन तरुणाला तिथे प्रवेश दिला
विशाल अगरवाल यांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली?
वडिलांनी मुलाला पब मध्ये जाण्याची का संमती दिली?
मुलाला खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला?
गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अगरवाल हे फरार का झाले?
ते जेव्हा संभाजी नगर मध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत?
वरील सगळ्या गोष्टीसाठी तपास करण्यासाठी सरकारी वकील यांनी मागितली ७ दिवसांची पोलीस कोठडी
विशाल अग्रवाल यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी द्या; सरकारी वकिल
पुणे : सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली.