एक्स्प्लोर

पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण : रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला नेमका कुणी दिला? समोर आली मोठी अपडेट

Pune Porsche Car Accident : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता ब्लड रिपोर्ट फेरफारप्रकरणी आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाचा (Pune Porsche Car Accident) सखोल तपास सुरु असून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या अपघात प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची सध्या कसून चौकशी सुरु आहे. या प्रकरणात विशाल अग्रवालच्या (Vishal Agarwal) मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात केली होती. आता या डॉक्टरांना रक्त बदलण्याचा सल्ला नेमका कुणी दिला याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला नेमका कुणी दिला? 

अश्फाक मकानदार आणि ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे डॉ. तावरे यांनीच रक्त बदलण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर येत आहे. मकानदार आणि डॉ. तावरे यांनीच अल्पवयीन मुलाऐवजी आईचे रक्त बदलण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशाल अग्रवाल आणि मकानदारची एका कॅफेत भेट झाली होती. तुमच्यावर कारवाई होईल, असा इशारा विशाल अग्रवालला मकानदारने दिला होता. या भेटीनंतर विशाल अग्रवाल हा संभाजीनगर येथे फरार झाला होता. पोलिसांनी त्याला संभाजीनगरमधून अटक केली होती. 

मकानदार, गायकवाडला 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी

अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांना अटक केली आहे. सध्या मकानदार आणि गायकवाड या आर्थिक व्यवहार करणाऱ्या दोघांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

अग्रवाल पिता-पुत्राविरूद्ध आणखी एक गुन्हा दाखल

कल्याणीनगर अपघातप्रकरणी चर्चेत असलेल्या सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या पिता-पुत्रासह पाच जणांवर बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अग्रवाल पिता-पुत्राच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सावकारी कर्जाला कंटाळून वडगाव शेरी येथे राहणाऱ्या 41 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने 9 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी विनय विष्णुपंत काळे याच्यावर जानेवारीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासात सुरेंद्रकुमार अग्रवाल, रामकुमार अग्रवाल, विशाल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवी हुडलानी आणि मुकेश झेंडे यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आणखी वाचा 

Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे कार अपघातानंतर तुम्ही पोलीस आयुक्तांना फोन केला होता का?; अजित पवार म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Embed widget