Pune Porsche car Accident : पोर्शे कार अपघातातील प्रत्येकाचा करेक्ट कार्यक्रम होणार; 'एआय'द्वारे अपघाताची घटना जिवंत करणार
पुणे पोर्शे कार अपघाताचा छडा लावण्यासाठी 'एआय'द्वारे अपघाताची घटना जिवंत करण्यात येणार आहे. पुणे पोलीस या प्रकरणात डिजीटल पुराव्यांवर भर देताना दिसत आहे.
पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यामुळेया प्रकरणाची चौकशीदेखील पुणे पोलीस खोलात जाऊन करताना दिसत आहे. अगदी बारीकसारीक पुरावे पुणे पोलीस गोळा करत आहे जेणेकरुन आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल आणि अग्रवाल कुटुंबियांची अरेरावी कायमची थांबेन. त्यातच आता पुणे पोलीस या सगळ्या अपघाताची माहिती मिळवण्यासाठी अॅडव्हान्स तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. पुणे पोलीस 'एआय'द्वारे अपघाताची घटना जिवंत करणार आहे.
पुणे पोर्शे कार अपघाताचा छडा लावण्यासाठी 'एआय'द्वारे अपघाताची घटना जिवंत करण्यात येणार आहे. पुणे पोलीस या प्रकरणात डिजीटल पुराव्यांवर भर देताना दिसत आहे. यासाठी हे पुरावे गोळा करणार आहे. डिजिटल पुराव्यासाठी पुणे पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. कल्याणीनगर अपघातातील दोषींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर देण्यात येत आहे. 'एआय' मधील तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुन्हा नवनवे खुसाले समोर येण्याची शक्यता आहे.
पुणे पोर्शे कार प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे. त्यात बिल्डर पुत्राच्या वडिलांपासून ते डॉक्टर आणि आमदारापर्यंत या प्रकरणात दोघी मानले जात आहे. वडिल, आजोबा, दोन डॉक्टर एक शिपाई यांना अटक करण्यात आली आहे. त्यात ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचादेखील प्रकार सुरेंद्र अग्रवाल याने केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहेय ज्या गाडीने डांबून नेलं ती गाडीदेखील पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. त्या कारचीदेखील पाहणी करण्यात येणार आहे आणि पोर्शे कारच्या कॅमेऱ्यातील व्हिडीओदेखील तपासले जाणार आहे.
मर्सिडीज गाडीवर झेब्रा क्रॉसिंग उल्लंघनाच्या दोन तक्रारी दाखल
बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल याच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली मर्सिडीज कार क्रमांक एमएच 12 पीसी 9916 ही गाडी पुण्यातील संगमवाडी बोट क्लब रोड या ठिकाणच्या एमएस एसीए रिसॉर्ट नावाने नोंदणीकृत आहे. गाडीवर मुंबई येथे 23 जानेवारी 2024 रोजी झेब्रा क्रॉसिंग उल्लंघनाची सीसीटीव्ही माध्यमातून दीड हजार रुपये दंडाची पावती आहे. तर 19 फेब्रुवारी 2024 रोजी पुण्यात देखील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी झेब्रा क्रॉसिंग उल्लंघनाची 500 रुपयांची दंड पावती पुणे वाहतूक पोलिसांनी केलेली आहे.
आणखी वाचा
पुणे अपघातप्रकरणात मोठा ट्विस्ट, ससूनमधला 'तो' कर्मचारी गायब, पोलीस CCTV फुटेज तपासणार