Pune Porsche Accident: विशाल अग्रवालचा पाय दिवसेंदिवस खोलात; एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल करण्याचा सपाटा, धनाढ्य बिल्डर पुरता फसला
Pune Porsche Accident: पोर्श प्रकरणात त्याचे कारनामे समोर आल्यानंतर हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुणे : पुण्यातील पोर्श कार अपघातप्रकरणी (Pune Porsche Accident) अटकेत असलेल्या विशाल अग्रवालच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये विशालवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस विशालला कधीही अटक केली जाऊ शकते. बावधन येथील ज्ञानसी ब्रह्मा सोसायटीने हा गुन्हा दाखल केलाय. 2007 साली बांधण्यात आलेल्या ब्रह्म सोसायटी धारकांची फसवणूक केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2010 साली पझेशन देऊनही विशालने पुढची पूर्तता केलेली नाही. सोसायटीत ठरलेल्या सुविधा, मोकळी जागा अद्याप दिलं नाही. तसेच आवारातील रिकन्स्ट्रक्शनसाठी परवानगी घेतली नाही. याप्रकरणी सोसायटी आणि विशाल अग्रवालचे वाद सुरु होते. पोर्श प्रकरणात त्याचे कारनामे समोर आल्यानंतर हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे पोलिसांच्या अटकेत असलेल्या विशालला कधीही अटक केली जाऊ शकते.
हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ब्रह्मा सोसायटीत 71 जणांनी फ्लॅट घेतला होता. सोसायटीच्या मालकीची तिथे पार्किंग आणि अँमीनीटी स्पेस, मोकळी जागा होती. नकाशात फेरबदल करून अग्रवालने सोसायटीच्या जागेवर 11 मजली इमारतीत 66 कमर्शियल ऑफिस बांधले. तर 10 मजली इमारतीत 27 सदनिका आणि 18 दुकाने सोसायटीधारकांचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल अग्रवालवर विविध गुन्हे
पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवालवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला 'तू कार चालवत होता असं पोलिसांना खोटं सांग' असं विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आणि आरटीओच्या तक्रारीचेही गुन्हे दाखल आहेत. आरटीओच्या तक्रारीनंतर कलम 420 च्या अंतर्गत दुसरा गुन्हा विशाल अग्रवालवर दाखल झाला आहे.
पुणे कार अपघात प्रकरण काय आहे?
पुण्यात 19 मे रोजी एका महागड्या पोर्शे कारचा अपघात झाला होता. या अपघातात अनिश अवधिया आणि आश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. ही महागडी गाडी विधिसंघर्षग्रस्त बालक चालवत होता, असा दावा केला जातो. त्यानंतर हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाल्याचेही म्हटले जाते. याच कारणामुळे या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. त्यानंतर आता पोलिसांच्या तपासात या प्रकरणी अनेक खुलासे होत आहेत.
हे ही वाचा :