एक्स्प्लोर

NCP: शिवस्वराज्य यात्रेच्या व्यासपीठावर अजितदादांच्या गटाच्या माजी आमदाराचा फोटो; पत्नीची व्यासपीठावर हजेरी, चर्चेला उधाण

NCP: शिवस्वराज्य यात्रेच्या व्यासपीठाच्या पाठीमागे असलेल्या डिजिटल स्क्रिनवर अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे यांचा फोटो लावल्याचे दिसून आले, तर त्यांची पत्नी शरद पवार गटाच्या व्यासपीठावर उपस्थित असल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

NCP: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांच्या गाठीभेटी, दौरे, बैठका, मतदारसंघातील गाठी-भेटी आणि  यात्रा यांना वेग आला आहे. अशातच काल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्यावतीने शिवस्वराज्य यात्रेला सुरूवात करण्यात आली आहे. अशातच काल या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांच्या पत्नीने हजेरी लावली होती. तर मागे लावलेल्या स्क्रीनवरती विलास लांडे (Vilas Lande) यांचा फोटो देखील लावण्यात आला होता, त्यामुळे पुन्हा एकदा विलास लांडे नेमके कोणत्या पक्षासोबत आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 

अजित गव्हाणेंनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर लांडेंनी केली होती टीका

अजित पवारांच्या पक्षातील 4 पदाधिकाऱ्यांसह एकूण 24 जणांनी शरद पवारांच्या उपस्थितीत (Sharad Pawar) पक्षात प्रवेश केला. यामध्ये माजी आमदार विलास लांडेंचे निकटवर्तीय अजित गव्हाणेंचा देखील समावेश होता. माजी आमदार विलास लांडेंनी अजित गव्हाणेंवर पक्षांतरानंतर टीका केली होती, 'अजितदादांनी शहरातील माझ्यासह अनेकांना पद देऊन मोठं केलं. मात्र दादा तुमच्या पुढं पुढं करणारे मोठे होऊन, तुम्हाला सोडून जातात. याची मला खंत आहे. दादा आता तुम्ही कडक शब्दात त्यांना समज द्या. ज्याला थांबायचं त्याने थांबावं नसेल तर सोडून जावं, असं म्हणत अजित गव्हाणेंवर विलास लांडेनी (Vilas Lande) टीका केली आहे. दरम्यान विलास लांडेंच्या मार्गदर्शनाने मी शरद पवार गटात गेल्याचा दावा गव्हाणेंनी केला होता. 

शिवस्वराज्य यात्रेच्या व्यासपीठावर विलास लांडे यांच्या पत्नीची हजेरी

काल (शुक्रवारी) भोसरीमध्ये पार पडलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या व्यासपीठावर विलास लांडे यांच्या पत्नी उपस्थित होत्या. व्यासपीठाच्या मागे लावलेल्या डिजिटल स्क्रिनवर विलास लांडे यांचा फोटो देखील पाहायला मिळाला. जुन्नरमधून शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी अजित पवार गटाचे आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांनी मंडपात जात तिथला आढावा घेतल्याने लांडेंची भूमिका काय आहे याबाबत चर्चा रंगली होती. संध्याकाळी झालेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या मेळाव्यात विलास लांडे यांच्या पत्नीने हजेरी लावली होती.

विलास लांडे यांच्याबाबत जयंत पाटलांची प्रतिक्रिया

विलास लांडे यांचा संपर्क झाला नाही.  शिवस्वराज्य यात्रेच्या मेळाव्यात ते होते की नाही हे मला माहित नाही. मला कुणी भेटलेल नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
Embed widget