Pune News : महाविकास आघाडीचा पुण्यात कार्यकर्ता मेळावा; महत्वाचे नेते उपस्थित, लोकसभेसाठीची रणनिती ठरणार?
महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) पुन्हा एकदा मेळावे (Pune Meleva) आणि सभांना सुरुवात केली आहे. पुण्यात महाविकास आघाडीचा पहिला मेळावा पुण्यातील कॉंग्रेसभवनमध्ये पार पडत आहे.
पुणे : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) पुन्हा एकदा मेळावे (Pune Meleva) आणि सभांना सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचा पहिला मेळावा पुण्यातील कॉंग्रेसभवनमध्ये पार पडत आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे , कॉंग्रेस नेते नाना पटोले, शिवसेनेचे (उबाठा) पुणे शहराध्यक्ष संजय मोरे, आमदार रविंद्र धंगेकर, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगपात, काँग्रेसचे रमेश बागवे, अरविंद शिंदे हे सगळे उपस्थित आहे.
महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा झाल्या. मात्र त्यानंतर या सभांना खंड पडला महाविकास आघाडीला अनेक धक्के सहन करावे लागले. अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडली आणि त्यानंतर कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हानांनी देखील भाजपात प्रवेश घेतला. हे सगळे धक्के बसल्यानंतर आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीने सभांना सुरुवात केली आहे.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
महविकास आघाडीत अनेक उलथापालथ झाल्यानंतर सगळ्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचा हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीचा राज्यातील हा पहिलाच मेळावा आहे. पुणे, शिरुर, मावळ आणि बारामती या चार मतदार संघाच्या स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांचा हा मेळावा आहे.
आजच सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला. त्यानंतर महाविकास आघाडीचा हा मेळावा पार पडत आहे. सुप्रिया सुळे, शरद पवार आणि शरद पवार गटाचे अनेक नेते या मेळाव्याला उपस्थित आहे. कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांनी थेट मेळावा गाठला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीने तयारीला सुरुवात केली आहे.
महाविकास आघाडीची रणनिती ठरणार
या मेळाव्यातून महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. महाविकास आघाडीची पुढची रणनिती कशी असेल?, कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम करायचं आहे? त्यासोबत शरद पवार गटाचं चिन्ह घराघरापर्यंत कसं पोहोचवणार?, या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे.
इतर महत्वाची बातमी-