(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Porsche Car Accident Pune : रॅश ड्रयाव्हिंग प्रकरणी पुणे पोलीस अॅक्शन मोडवर; धडाधड चौकशी सुरु, सुरेंद्र अग्रवाल नंतर आता ड्रायव्हरला बोलवलं!
पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पुणे पोलिसांवर अनेक विरोधकांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर आता पुणे पोलीस या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करताना दिसत आहे
पुणे : पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पुणे पोलिसांवर अनेक विरोधकांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर आता पुणे पोलीस या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करताना दिसत आहे. या अपघाताची संबंधित असलेल्या व्यक्तींना पुण्यातील पोलीस आयुक्तालयात बोलवण्यात येत आहे आणि सगळ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी केली जात आहे. सकाळी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना बोलवण्यात आलं होतं. त्यांची चोकशी करण्यात आली त्यानंतर आता या अपघाताच्या वेळी गाडीत हजर असलेल्या ड्रायव्हरला चोकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
कल्याणी नगरमध्ये अल्पवयीन मुलाकडून जेव्हा अपघात घडला तेव्हा कारमध्ये शेजारच्या सीटवर ड्रायव्हर देखील बसला होता. या ड्रायव्हरला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं असून गुन्हे शाखेकडून त्याची चौकशी करण्यात येतेय. गंगाराम पुजारी असं या ड्रॉयव्हरचं नाव आहे. विशाल अग्रवालने आपल्या अल्पवयीन मुलाला गंगारामसोबत पाठवलं होतं. मात्र पार्टीत दारू पिल्यानंतर या अल्पवयीन मुलाने गंगारामला बाजूच्या सीटवर बसायला सांगून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर गाडी चालवायला बसला आणि वेगाने गाडी चालवून दोघांचा बळी घेतला.
विशाल अग्रवालाला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलंय तर त्या अल्पवयीन मुलाला पाच जूनपर्यंत बाळ निरीक्षण गृहात पाठवण्यात आलंय. त्यानंतर आज पोलिसांनी विशाल अग्रवालचा वडील सुरेंद्रकुमार अग्रवालला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर अपघातावेळी गाडीत उपस्थित असलेल्या गंगाराम पुजारी या ड्रॉयव्हरला चौकशीसाठी बोलावण्यात आलं.
पुणे पोलीस आयुक्तालयात सगळ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी केली. महत्वाचं म्हणजे यावेळी विशाल अग्रवालदेखील या ठिकाणी हजर करण्यात आलं आहे. दोघांची आमोरासमोर चौकशी करण्यात आली. आम्ही पोलिसांच्या चौकशीला मदत करत आहोत. त्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत , असं सुरेंद्र अग्रवाल यांनी चौकशीनंतर सांगितलं. त्यानंतर माध्यमांनी त्यांना छोटा राजन आणि बाकी या प्रकरणासंदर्भात अनेक प्रश्न विचारले मात्र त्यांनी यातील कोणत्याही प्रश्नांची उत्तर देण्यास टाळाटाळ केली.
मुलाने जर कार मागितली तर त्याचा चालवू दे तू बाजूला बसं; ड्रायव्हरनं कोर्टात सांगितलं!
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी विशाल अग्रवाल यांच्या ड्रायव्हरने धक्कदायक माहिती जबाबत दिली. मुलाने जर कार मागितली तर त्याचा चालवू दे तू बाजूला बस, अशाप्रकरच्या एकनाअधिक सुचना ड्रायव्हरला विशाल अग्रवालने दिल्या असं ड्रायव्हरने जबाबात सांगितलं.
इतर महत्वाची बातमी-