Pune Police : अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
गुन्हेगारीचे उदात्तीकरण करत असल्याच्या पोस्ट किंवा व्हिडीओ दिसले तर ते अकाउंट तर सस्पेंड होईलच पण ते चालवणारे तरुणांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पुणे : पुणे पोलिसांचा (Pune Police) अंत पाहू नका... सुरुवातीला हात जोडू पण संयम तुटला तर कडक कारवाई करु असा सज्जड दम पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी दिलाय. आमची दादागिरी काय असते ते तुम्हाला दाखवू असा इशारा अवैध व्यावसाय करणाऱ्यांना दिला आहे. गेल्या काही दिवसात ड्रग्ज प्रकरण, अनाधिकृत पब, अवैध धंदे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अमितेश कुमारांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांच्या नागरी संवादाचे आयोजन पुण्यात केले होते. सामाजित सलोखा, वाढती बाल गुन्हेगारी, वाढती व्यसनाधीनता आणि कायदा सुव्यवस्तेबाबत आयुक्तांनी संवाद साधला. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवैघ धंदा करणाऱ्यांना तंबी दिली आहे. मारहाण करणे त्याचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. पुणे पोलिसांचा संयम तुटला तर कडक कारवाई करण्यात येईल. येरवड्यात आंतर्धमीय विवाहवरून झालेला खून यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर अमितेश कुमार बोलत होते. गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले आहेत .
कठोर कारवाईचा इशारा
पुण्यातील नामचीन गुंडांचे किंवा त्यांच्या भाईंच्या नावाने अनेक अकाउंट बनवले आहेत आणि याच अकाउंटवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्या ही गुन्हेगारीचे उदात्तीकरण करत असल्याच्या पोस्ट किंवा व्हिडीओ दिसले तर ते अकाउंट तर सस्पेंड होईलच पण ते चालवणारे तरुणांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
आयुक्तांचे चॅलेंज
पोर्शे कार अपघात, कोयता गँगची दहशत, त्यानंतर ड्रग्ज प्रकरण या घटनेनंतर पुणे पाोलीस आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. विरोधकांनी पुणे पाोलीस आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्त अमितशे कुमार यांनी पत्रकार परिषद (Pune Police Commissioner Amitesh Kumar Press) घेत आपली बाजू मांडली आहे. तसंच पुणे पोलिसांच्या (Pune Police) कारवाईवर प्रश्न विचारणाऱ्यांना आयुक्तांचं बेधडक आव्हान दिले आहे. पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा आणखी जास्त कडक भूमिका कोणी सुचवत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असे चँलेज त्यांनी दिले होते.
हे ही वाचा :
Pune News : अल्पवयीन मुलांचे नको ते प्रताप, पालकांनी उचलले मोठं पाऊल; लेकरांच्या मागे लावले चक्क 'डिटेक्टिव्ह'