एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यात PMPML बसचालकाचं फोनवर बोलत ड्रायव्हिंग
शीतल मुंढे या सजग तरुणीनं पुणे महापालिका ते बालेवाडी मार्गावर प्रवास करताना ड्रायव्हर फोनवर बोलत असतानाचा व्हिडिओ मोबाईलवर शूट केला.
पुणे : वाहन चालवताना फोनवर बोलल्याचे घातक दुष्परिणाम वारंवार समोर येऊनही काही जण त्यातून शिकवण घेत नसल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातल्या पीएमपीएमएलचा बसचालकच फोनवर बोलत बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शीतल मुंढे या सजग तरुणीनं पुणे महापालिका ते बालेवाडी मार्गावर प्रवास करताना ड्रायव्हर फोनवर बोलत असतानाचा व्हिडिओ मोबाईलवर शूट केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
पीएमपीएमएलच्या अपघातात पुणेकरांचे जीव जात असताना बसचालकांनी पुणेकरांच्या जीवाशी खेळणं थांबवावं आणि पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी संबंधित बसचालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शीतल मुंढे या तरुणीनं केली आहे.
आता पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यावर काय कारवाई करतात, याकडे प्रवाशांचं लक्ष लागलं आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement