(Source: Poll of Polls)
70000000 किमतीचा घोडा, 1100 स्पर्धांमध्ये अव्वल, मिनरल वॉटरच पिणार, दररोज 15 लि. दूध, पिंपरीतील घोड्याची एकच चर्चा!
pune News : तब्बल सात कोटी रुपये किमतीचा अश्व (horse )… असे म्हटल्यास अविश्वसनीय वाटत असेल. हे पाहण्यासाठी अक्षरश: पशू प्रेमींची झुंबड उडाली.
Pune News : तब्बल सात कोटी रुपये किमतीचा अश्व (horse )… असे म्हटल्यास अविश्वसनीय वाटत असेल. पण, होय… पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) आयोजित देशातील सर्वात मोठ्या देशी गोवंश व अश्व पशू प्रदर्शनामध्ये सात कोटी रुपयांचा जातीवंत अश्व पहायला मिळाला. तो दिसतो कसा…? हे पाहण्यासाठी अक्षरश: पशू प्रेमींची झुंबड उडाली. यावेळी सात कोटींच्या अश्वाची (horse ) चर्चा रंगली होती. या पशुप्रदर्शनामध्ये खिल्लार, देवणी, लालकंधारी, थारपारकर, म्हैस, रेडा, कांकरेंज, गीर, डांगी, साहिवाल, पुंगनूर, मालनाड गिड्डा, कपिला गाय बैल तसेच मारवाडी व भीमथडी अश्व मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक काढण्यात येणार आहेत. पहिल्या क्रमांकाच्या गोवंश आणि पशूंचे ‘रॅम्प वॉक’ झाले, असा प्रयत्न भारतात प्रथमच झालाय.
पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल सात कोटींचा अश्व अवतरला होता. फ्रेजेंड असं त्या अश्वाचं नाव आहे. पंधरा लिटर दूध तसेच फक्त मिनरल वॉटर पिणारा, पाच किलो हरभरा अन् पाच किलो डाळींचा असा त्याचा रोजचा खुराक आहे. इतकेच नाही तर फ्रेंजेडची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह चौघे चोवीस तास तैनात असतात. फ्रेंजेडच्या वाहतुकीसाठी खास रुग्णवाहिका ही निर्माण करण्यात आलेली आहे. त्याच्या देखभालीसाठी महिन्याला अडीच ते तीन लाख खर्ची घातले जातात. फ्रेंजेडचे वय अवघे चार वर्षे आहे, पण इतक्या कमी वयात तो तब्बल अकराशेहून अधिक स्पर्धांमध्ये कायम बाजी मारत आलाय.
या पशू प्रदर्शनातही फ्रेंजेड अपेक्षेनुसार अव्वल ठरला. फ्रेंजेड हा मूळचा राजस्थानचा असून तो मारवाडी जातीचा आहे. फ्रेंजेड हायब्रीड आहे आणि सध्या तो गुजरातमध्ये असतो, युवराज जडेजा त्याचा सांभाळ करतो. एका रशियन व्यक्तीने फ्रेंजेडसाठी सात कोटींची बोली लावली होती, मात्र जडेजाने त्यास नकार दिला होता.
अश्वाचा खुराक काय?-
मूळचा राजस्थानी असलेल्या घोड्याचं नाव फ्रेंजेड आहे. हा मारवाडी प्रकारचा घोडा आहे. फ्रेजेंडचा खुराक जाणून तुम्हालाही धक्का बसेल. घोडा मालक युवराज जडेजाने सांगितले की, हा घोडा 15 लीटर दूध पितो. दररोज 5 किलो हरभरा आणि 5 किलो डाळी खातो. आणि हो फक्त ‘मिनरल वॉटर’च पितो. फ्रेजेंड हाइब्रिड असल्याचे घोडा मालक सांगतात. फ्रेजेंडचे वडील राजस्थानी, तर आई रत्नागिरी प्रजातीची आहे. तो 4 वर्षांचा असून गेल्या दीड वर्षांपासून युवराजसोबत आहे. फ्रेजेंडने आतापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तसेच तब्ब्ल 1100 हून स्पर्धांमध्ये तो 'विजेता' ठरला आहे. आजपर्यंत एकाही घोड्याने त्याचा पराभव केलेला नाही.