एक्स्प्लोर
अनैतिक संबंधातून आई-पत्नी-लेकीची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी

पुणे : पुण्यात 2012 मध्ये घडलेल्या तिहेरी हत्याकांडप्रकरणी विश्वजीत मसलकरला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. अनैतिक संबंधांत अडथळा ठरु नये म्हणून आई, पत्नी आणि 2 वर्षांच्या मुलीची विश्वजीतनं निर्घृणपणे हत्या केली होती. 50 वर्षीय आई शोभा, 25 वर्षीय पत्नी अर्चना आणि दोन वर्षांची मुलगी किमया यांची विश्वजीतने राहत्या घरी हत्या केली होती. त्याचबरोबर शेजारी राहणाऱ्या मधुसुदन कुलकर्णी यांनाही गंभीर जखमी केलं होतं. तिघींचे जीव घेतल्यानंतर चोरीच्या उद्देशानं ही हत्या झाल्याचा बनाव करत विश्वजीतनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीनं सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत विश्वजीत विरोधात सर्व पुरावे गोळा करुन त्याचा गुन्हा सिद्ध केला. अखेर त्याला सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























