![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Omicron Update : दिलासादायक...! पुण्यातील एक तर पिंपरी-चिंचवडमधील सहा ओमायक्रॉन रुग्ण बरे, अजित पवारांची माहिती
Pune Omicron Update : पुण्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. पुण्यातील ओमायक्रॉनचा एकमेव रुग्ण बरा झाला आहे. तर पिंपरी-चिंचवड मधील सहा पैकी चार ओमायक्रॉनचे रुग्ण बरे झाले आहेत
![Pune Omicron Update : दिलासादायक...! पुण्यातील एक तर पिंपरी-चिंचवडमधील सहा ओमायक्रॉन रुग्ण बरे, अजित पवारांची माहिती Pune Omicron Update one Omicron patient from Pune and six patients from Pimpri-Chinchwad were cured Ajit Pawar says Pune Omicron Update : दिलासादायक...! पुण्यातील एक तर पिंपरी-चिंचवडमधील सहा ओमायक्रॉन रुग्ण बरे, अजित पवारांची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/08/86139cba54b58e7c6a009d4f7b7a1a45_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Omicron Update : पुण्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. पुण्यातील ओमायक्रॉनचा एकमेव रुग्ण बरा झाला आहे. तर पिंपरी-चिंचवड मधील सहा पैकी चार ओमायक्रॉनचे रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. तर पुणे जिल्ह्यात पहिल्या डोसचे लक्ष पूर्ण झालं आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे. पिंपरी चिंचवडमधील सहापैकी चार ओमायक्रोन रुग्ण निगेटिव्ह झाले आहेत. यात 44 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, सात आणि दीड वर्षीय मुलींचा समावेश आहे. तर 12 आणि 18 वर्षीय मुलींचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
...तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार
अजित पवारांनी सांगितलं की, दुसऱ्या डोसचे प्रमाण पहिल्या डोसच्या तुलनेत कमी आहे. ओमायक्रॉनमुळे लोक दुसऱ्या डोसलाही प्रतिसाद द्यायला लागलेत. पण जुन्नर, दौंड, पुरंदर आणि बारामती या चार तालुक्यात डोसचे प्रमाण कमी आहे. ते वाढवण्यास प्रशासनास सांगितलं आहे. येत्या आठवड्यात आम्ही या चार तालुक्यात दुसर्या डोससाठी प्रयत्न करणार आहोत. परंतु पुढच्या आठवड्यात या चार तालुक्यातील नागरिकांनी याला प्रतिसाद नाही दिला तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांनी म्हटलं आहे की, कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये तूर्तास कोणताही बदल नाही. परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असं ते म्हणाले. बुस्टर डोसबाबात विचार सुरु आहे. पण त्यासाठी देशपातळीवर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात यावा, असं अजित पवार म्हणाले. सीरम इन्स्टिट्यूटकडे बुस्टर डोस उपलब्ध आहे, असं ते म्हणाले.
आरोग्य विभागाची परीक्षा पुन्हा घेण्याबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
आरोग्य भरतीबाबत बोलताना ते म्हणाले की, आरोग्य विभागासारखी एवढी मोठी परीक्षा एमपीएससीकडून घेणे अशक्य आहे. आरोग्य भरतीत गैरप्रकार झाला आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांना अशी शिक्षा करु की, पुन्हा कोणाची पेपर फोडण्याची हिंमत होणार नाही, असं ते म्हणाले. आरोग्य विभागाची गट क आणि गट ड ची परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी होतेय. त्याबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे, असं ते म्हणाले.
केंद्र सरकारकडून इतर राज्यांसाठी एअरपोर्टच्या बाबतीत वेगळा न्याय आणि महाराष्ट्रासाठी वेगळा न्याय देण्यात येत होता, असं देखील ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)