एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pune News : नायलॉन मांजामुळे दोन पोलीस कर्मचारी जखमी; एकाचा गळा, तर दुसऱ्याचा हात चिरला

नायलॉनच्या मांजामुळे दोन पोलीस  (Makar Sankranti 2023)  कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. पुणे सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर ही घटना घडली.

Pune Nylon Manja News :  नायलॉनच्या मांजामुळे (nylon manja) दोन पोलीस  कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. पुणे सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर ही घटना घडली. यात दोन्ही पोलीस (police) जखमी झाले आहेत. एकाचा गळा, तर दुसऱ्याचा हात चिरला आहे. दोघेही दुचाकीवरुन प्रवास करत असताना ही घडना घडली आहे. 

महेश पवार आणि सुनिल गवळी अशी या दोन जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दोन्ही पोलीस पुणे सातारा रस्त्यावरील शंकरमहाराज उड्डाणपुलावरुन निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरुन जात असताना मानेला मांजा अडकला आणि पवार यांच्या मानेला जखम झाली. त्याचवेळी त्यांच्यासोबत असलेला सहकारी त्यांचा हात चिरला, अशी माहिती पक्षीप्रेमी बाळासाहेब ढमाले यांनी दिली. 

शहरात मागील काही दिवसांपासून अनेक पक्षी मांजाच्या फासेत अडकले आहेत. आतापर्यंत पुण्यातील पक्षीप्रेमी बाळासाहेब ढमाले यांनी किमान 20 पक्ष्यांना मांजाच्या विळख्यातून जीवनदान दिलं आहे. कसबा पेठेत मांजात अडकलेल्या तीन घारींची सुटका केली. ढमाले यांनी तीन घारींची मांजातून सुटका करुन कात्रज येथील प्राणी, पक्षांच्या अनाथालयात उपचारासाठी दाखल केले.

नायलॉन मांजा वापरून पतंग बराच काळ उडवता येतो, अशी समजूत असल्याने अनेक लोक पतंग उडवण्यासाठी मांजाचा वापर करतात. परंतु नागरिकांनी त्याचे दुष्परिणाम ओळखून नायलॉन मांजा बंद करणे आवश्यक आहे. त्यावर बंदी घातलेली आहेच. लोकांनी ते वापरु नये. तरच पक्षी, नागरिक जखमी होणार नाहीत, असं आवाहन पक्षी प्रेमींकडून दरवर्षी केलं जातं. मात्र दरवर्षी अनेक पक्षी या मांजामुळे जखमी झाल्याचं बघायला मिळतं. 

औरंगाबाद शहरात कारवाई पुण्यात कधी?

मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी औरंगाबाद शहर पोलिसांनी नायलॉन मांजाच्या (Nylon Manja) विरोधात मोठी कारवाई केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी साठेबाजांवर धाडी टाकून पोलिसांनी नायलॉन मांजा जप्त केला आहे. औरंगाबाद शहरातील सिटी चौक आणि जिन्सी भागातील दोन गोडाऊनवर पोलिसांनी छापा टाकत तब्बल 15 लाखांचा मांजा जप्त करुन आरोपींना अटक केली. नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहर पोलिसांकडून प्रत्येक ठाण्यात उपनिरीक्षकांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. दरम्यान मकरसंक्रांतीच्या एक दिवस आधी या पथकांनी जोरदार कारवाई केली आहे. शहर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत एकूण 15 लाखांचा मांजा जप्त केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 AM : 29 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines  : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 06 AM : 29 NOV 2024Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण? VIDEO
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण?
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Embed widget