Pune MNS News : मराठी लिहू, मराठी जपू! सोशल मीडियाच्या जगात मनसे चित्रपटसेनेकडून राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धा
सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात आणि कंम्प्युटरच्या जगात सुंदर अक्षरच नाही तर लेखनाचाही आपल्याला विसर पडला आहे. मात्र मराठी भाषेसाठी आणि मराठीसाठी पहिल्या दिवसांपासून काम करणाऱ्या मनसे चित्रपटसेनेकडून पुण्यात अनोखी स्पर्धा घेण्यात येणार आहे.
पुणे : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात आणि कंम्प्युटरच्या जगात (Pune News ) सुंदर अक्षरच नाही तर लेखनाचाही आपल्याला विसर पडला आहे. मात्र मराठी भाषेसाठी आणि मराठीसाठी पहिल्या दिवसांपासून काम करणाऱ्या मनसे चित्रपटसेनेकडून 'मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुण्यात अनोखी स्पर्धा घेण्यात येणार आहे. एकीकडे जग टेक्नोलॉजीकडे वळत असताना मनसे चित्रपटसेनेने मात्र हस्ताक्षर स्पर्धा (State Level Handwriting Competition) आयोजित केली आहे. लेखन स्पर्धाजरी असली तरी या स्पर्धेत सगळ्यांना ऑनलाईनपद्धतीने सहभागी होता येणार आहे.
मनसे चित्रपटसेनेचे पुणे शहराचे अध्यक्ष चेतन धोत्रे सांगतात की, शाळेत असताना खरं तर अभ्यासात जो कमी त्याचंच अनेकदा हस्ताक्षर भारी असायचं माझ्या आसपास तरी अनेकदा मला तसेच आढळलं. आता खरं तर लिहायची सवयच या मोबाईल आणि टेक्नोलॉजीकडे मुळे कमी झालीये, हेच ध्यानात घेऊन जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत मनसे चित्रपट सेना,राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही 'चांगल्या वळणाची माणसे' शोधत आहोत.
त्यासोबत स्पर्धकांकडून मराठी भाषेसाठी प्रतिज्ञादेखील घेण्यात येणार आहे. मी महाराष्ट्रात जन्माला आल्याचा आणि अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी माझी मातृभाषा असल्याचा मला अभिमान आहे. मराठी भाषेचं उज्ज्वल अस्तित्व, जतन आणि संवर्धन त्याचप्रमाणे तिच्या उन्नतीकरीता मी निरंतर कटीबध्द आहे. जगभरात कुठेही असलो तरी मराठी भाषेवरील निरतिशय प्रेमात खंड न पडू देण्याची ग्वाही एक सच्चा मराठी भाषिक म्हणून मी देत आहे. कुठल्याही सांस्कृतिक बदलांच्या व भाषेच्या आक्रमणासमोर मराठीची पिछेहाट होऊ न देण्यासाठी व्यवहारात तिचा सातत्यपूर्ण वापर करणे ही माझी जबाबदारी आहे. मराठी भाषा ही माझ्यासाठी मायेची पांघर आहे. तिच्या सौदर्यवृध्दीसाठी प्राणपणाने झटणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी अर्हनिश पार पाडत राहिन, अशी ही प्रतिज्ञा असणार आहे,
स्पर्धेच्या अटी नेमक्या कोणत्या?
ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रवेश विनामूल्य आहे. 'मराठी भाषा प्रतिज्ञा' स्व- हस्ताक्षरात एकेरी ओळीच्या A4 आकाराच्या कागदावर लिहून PDF स्वरुपात mnckspune@gmail.com या ईमेल पत्यावर पाठवावा. सुंदर, वळणदार आणि व्याकरणशुद्ध हस्ताक्षर बक्षिसास पात्र ठरेल. आपले संपूर्ण नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, वय आणि पत्ता परिच्छेदाच्या खाली पाच ओळी सोडून नमूद करावे, प्रवेशपत्रिका स्वीकारण्याची अंतिम तारीख 29फेब्रुवारी 2024 आहे.
इतर महत्वाची बातमी-