एक्स्प्लोर

Pune news : उन्हाचा चटका वाढला; राज्याला पुढील 10 दिवस 'ऑक्टोबर हिट'च्या झळा

पुढील दहा दिवस राज्याला ऑक्टोबर हीटच्या झळा बसणार आहे. त्यानंतर तापमानात हळूहळू  घट होणार आहे, असं अंदाज हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे.

पुणे : पुढील दहा दिवस राज्याला ऑक्टोबर (october heat) हीटच्या झळा बसणार आहे. त्यानंतर तापमानात हळूहळू घट होणार आहे, असं अंदाज हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला. विदर्भात तापमान सरासरी 35 अंशावर जाणार असून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकणात सरासरी तापमान 33 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस उन्हाच्या झळा जाणवणार आहे.

राज्याच्या बहुतांश भागांतून मान्सूनने माघार घेतल्याने कोरडे हवामान आहे. उन्हाचा तडाखा तीव्र स्वरुपाचा जाणवणार आहे. पावसाची शक्यता नाही. ही उष्णतेची लाट पुण्यापूरती मर्यादित नाही तर राज्यात उष्णतेच्या झळा जाणवणार आहे. गेल्या 24 तासांत राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे 37.1 अंश सेल्सिअस तर अकोल्यात 37.2 अंश सेल्सिअस नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पारा 34 अंशांच्या वर गेला आहे.येत्या रविवारी म्हणजेच 15 ऑक्टोबरपर्यंत पुणे आणि परिसरात कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पाऊस नसल्यामुळे नागरिकांना पुढील आठवड्यात उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.

मागील चार-पाच वर्षांच्या तुलनेत यंदा 14 दिवस अगोदर मोसमी वारे राज्यातून माघारी गेले आहे. त्यामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडत आहेत. सध्या सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे भारतीय उपखंडाला जास्त उष्णता मिळत आहे, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. देशातील वातावरणावर ऑगस्टपासून एल-निनोचा प्रभाव दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून ऑक्टोबर हीटच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. पुढील दहा दिवस अशीच स्थिती राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती तापमान ?

पुणे- 34.7 अंश सेल्सिअस
लोहगाव- 33.1 अंश सेल्सिअस
अहमदनगर-NA
जळगाव- 36.2 अंश सेल्सिअस
कोल्हापुर-32.6 अंश सेल्सिअस
महाबळेश्वर-26.4अंश सेल्सिअसनाशिक- 33.7अंश सेल्सिअस
सांगली- 32.7अंश सेल्सिअस

सातारा- 32.8अंश सेल्सिअस
सोलापुर-35.2अंश सेल्सिअस
मुंबई-31.7अंश सेल्सिअस
सांताक्रूज-33.6अंश सेल्सिअस
अलिबाग-31.6अंश सेल्सिअस
रत्नागिरी-33.5अंश सेल्सिअस
पणजी-32.0अंश सेल्सिअस
डहाणू -33.6अंश सेल्सिअस
उस्मानाबाद-Na
औरंगाबाद-34.2अंश सेल्सिअस
परभणी- 35.7अंश सेल्सिअस
नांदेड-NA
बीड-32.7अंश सेल्सिअस
अकोला- 37.2अंश सेल्सिअस
अमरावती-35.0अंश सेल्सिअस
बुलढाणा-33.2अंश सेल्सिअस
ब्रम्हपूरी-35.8 अंश सेल्सिअस
चंद्रपूर-35 अंश सेल्सिअस
गोंदिया-34.9अंश सेल्सिअस
नागपुर-36.1 अंश सेल्सिअस
वाशिम-36.0 अंश सेल्सिअस
वर्धा-35.5 अंश सेल्सिअस
यवतमाळ-35.7 अंश सेल्सिअस

इतर महत्वाची बातमी-

डॉक्टर पत्नीच्या अपघाताचा रचला बनाव, भावाच्या तक्रारीमुळे सत्य समोर, पतीनंच डोक्यात दगड घालून संपवल्याचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? राष्ट्रवादीच्या माझ्या आमदाराचा स्वपक्षाला घरचा आहेर
सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? राष्ट्रवादीच्या माझ्या आमदाराचा स्वपक्षाला घरचा आहेर
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget