एक्स्प्लोर

Pune News : बहुप्रतिक्षीत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल आजपासून सुरू; अत्याधुनिक सोई-सुविधांसह पुण्याच्या संस्कृतीची दिसली छाप

Pune News : पुणेकरांना प्रतिक्षा असलेलं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल आजपासून कार्यान्वित  झालं आहे. आज दुपारी १ वाजल्यापासून हे टर्मिनल पुणेकरांसाठी सुरु झालं आहे.

Pune News : पुणेकरांना प्रतिक्षा असलेलं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं(Pune International Airport) नवं टर्मिनल आजपासून कार्यान्वित  झालं आहे. आज दुपारी १ वाजल्यापासून हे टर्मिनल पुणेकरांसाठी सुरु झालं आहे. नव्या टर्मिनलमधून वर्षाला ९० लाख प्रवाशांना ये-जा करता येणार आहे. सुसज्ज व्यवस्थांसह या विमानतळाला ६ बोर्डिंग गेट निर्माण करण्यात आले आहेत. एकाचवेळी पंधराशे ते अठराशे प्रवाशांना बसण्याची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. अत्याधुनिक सोई-सुविधांसह पुण्याच्या संस्कृतीची छाप या टर्मिनलवर पाहायला मिळत आहे.

पुणेकर प्रतिक्षेत असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं(Pune International Airport)नवं टर्मिनल आता कार्यान्वित झालं आहे.आज रविवारी (१४ जुलै) दुपारी १ वाजल्यापासून हे टर्मिनल पुणेकरांसाठी सुरू झालं आहे.पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल सुरु करण्यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी खासदारपदी विजयी झाल्यानंतरच पाठपुराव्याला सुरुवात केलेली होती. यासाठी सर्वात मोठा असलेला सीआयएसएफच्या जवानांच्या संख्येचा प्रश्न मोहोळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन सोडवला होता. तसेच इतर तांत्रिक प्रक्रियाही पूर्ण करुन घेतल्या आणि नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा केला होता.

महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा इमारतीच्या बाहेर उभारण्यात आला आहे. श्री विठ्ठलाचे म्युरल, वारली कला, देशी  खेळ मल्लखांब आदींचे दर्शन या इमारतीत घडते. आपल्या स्थानिक संस्कृतीला साजेसे वातावरण  इमारतीत आहे.  

नव्या टर्मिनलवरून एअर इंडिया एअरलाइन्सच्या विमानाचे पहिलं उड्डाण झाले आहे. केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पहिल्या प्रवाशाला दुपारी 1 वाजता बोर्डिंग पास देण्यात आली आहे.

 प्रवाशांना खरेदी करसाठी विविध दुकाने, खाद्यपदार्थ आदी सोई या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. लहान मुलांच्या देखभालीसाठी शिशू देखभाल कक्ष उभारण्यात आला असून त्यात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. टर्मिनलवर प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी दोन ई-बस आणि आठ ई-कार्टची सुविधा उपलब्ध असणार आहे. प्रवाशांना टर्मिनलच्या गेटपर्यंत ओला, उबेरच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

कसे आहे नवीन टर्मिनल?

एकूण क्षेत्रफळ : 52 हजार चौरस मीटर
तासाला प्रवासी क्षमता : 3 हजार
वार्षिक प्रवासी क्षमता : 90 लाख
वाहनतळ क्षमता  : 1 हजार मोटारी
प्रवासी लिफ्ट : 15
सरकते जिने : 8
चेक-इन काऊंटर : 34
एकूण खर्च – 475 कोटी रुपये

व्यस्त वेळेत 3 हजार प्रवासी क्षमता

भारतीय विमानतळांना आधुनिक सुविधा देण्यात येणार आहे. विमानतळावर स्थानिक संस्कृतीला प्रदर्शित करण्यात आलं आहे. पुणे विमानतळाच्या(Pune International Airport)एकात्मिक टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 52 हजार चौ.मीटर असून सर्वाधिक व्यस्त वेळेत 3 हजार प्रवासी क्षमता आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana Palash Muchchal: स्मृतीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, 40 लाख बुडवल्याच्या आरोपानंतर बालपणीच्या मित्राचे पलाश मुच्छलवर गंभीर आरोप
स्मृतीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, 40 लाख बुडवल्याच्या आरोपानंतर बालपणीच्या मित्राचे पलाश मुच्छलवर गंभीर आरोप
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Maharashtra Live blog updates: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Live blog updates: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर

व्हिडीओ

Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana Palash Muchchal: स्मृतीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, 40 लाख बुडवल्याच्या आरोपानंतर बालपणीच्या मित्राचे पलाश मुच्छलवर गंभीर आरोप
स्मृतीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, 40 लाख बुडवल्याच्या आरोपानंतर बालपणीच्या मित्राचे पलाश मुच्छलवर गंभीर आरोप
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Maharashtra Live blog updates: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Live blog updates: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Mumbai Mayor Election 2026: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय अन्...
मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय अन्...
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
Embed widget