Pune Lonavala Local Megablock : पुणे – लोणावळा लोकल मार्गावर उद्या मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी...
पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक (Pune Lonaval Meghablock) असणार आहे. पुणे लोणावळा लोकल उद्या बंद राहणार आहे. पुणे लोणावळा दरम्यान तांत्रिक कामासाठी उद्या हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
![Pune Lonavala Local Megablock : पुणे – लोणावळा लोकल मार्गावर उद्या मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी... Pune News megablock on pune lonavla pune route tomorrow sunday 3rd march for technical work Pune Lonavala Local Megablock : पुणे – लोणावळा लोकल मार्गावर उद्या मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/02/8ca59767eb313026dbcf6b42e670cf551709352514652442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक (Pune Lonavala Local Block) ) असणार आहे. पुणे लोणावळा लोकल उद्या बंद राहणार आहे. पुणे लोणावळा दरम्यान तांत्रिक कामासाठी उद्या हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पुण्याहून लोणावळ्याला जाणाऱ्या आणि लोणावळ्यातून पुण्याला येणाऱ्या सर्व लोकल उद्या रविवारी दिवसभर राहणार बंद राहणार आहे. उद्या एकूण 7 लोकल रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आल्याबद्दल नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल खेद व्यक्त केली आहे. मात्र या गाड्या रद्द असल्याने आणि रविवार असल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
लोणावळा, तळेगावहून रद्द लोकल गाड्या :
1. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी 10:05 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
2.लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी 11:30 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
3. लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी 2:05 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
4. तळेगावहून पुण्यासाठी सायंकाळी 4:40 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
5. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी 5:30 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
6. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी 6:05 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
7. लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी 7 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
शिवाजीनगरहून लोणावळ्यासाठी रद्द झालेल्या गाड्या...
1. पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 9:57 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
2. पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 11:17 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
3. शिवाजीनगरहून लोणावळ्यासाठी दुपारी 12:05 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
4. पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी 3 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
5. शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी 3:47 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
6. पुण्याहून लोणावळ्यासाठी सायंकाळी 4:25 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
7. शिवाजीनगरवरून लोणावळ्यासाठी सायंकाळी 5:20 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)