Pune Crime News : वाहन तोडफोड करण्याऱ्यांची आता खैर नाही; वाहन तोडफोड होणाऱ्या भागांचे "मॅपिंग" करा, पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश
सलग दोन दिवस वाहनतोडीची प्रकरणं समोर आली. त्यात वाहनांचं मोठं नुकसान झालं. हे सगळं रोखण्यासाठी वाहन तोडफोड होणाऱ्या भागांचे मॅपिंग करण्याचे आदेश पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
पुणे : पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यातच गुन्हेगारांची परेड काढल्यानंतर (PUNE CRIME) काहीच दिवसांत पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं. त्यानंतर काहीच दिवसांत सलग दोन दिवस वाहनतोडीची प्रकरणं समोर आली. त्यात वाहनांचं मोठं नुकसान झालं. हे सगळं रोखण्यासाठी वाहन तोडफोड होणाऱ्या भागांचे मॅपिंग करण्याचे आदेश पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
शहरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना बंद झाल्या पाहिजेत, अशा आरोपींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे शहरात वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. येरवडा, मुंढवा यासह काही भागात मागील काही दिवसात वाहन तोडफोडीच्या घटना वाढल्या आहेत. यात परिसरात दहशत माजवण्याचे प्रकार सुरु आहे. अल्पवयीन मुलांपासून मोठ्या टोळ्यांपर्यंत सगळेच वेगवेगळ्या कारणाने पुण्यात दहशत पसरवाताना दिसत आहे. या भुरट्यांकडून नागरिकांच्या महागड्या गाड्या फोडल्या जात आहे. त्यासोबतच गाड्यांचं नुकसान झालं आहे.
त्यासोबतच अनेक परिसरात अजूनही ड्रग्स तस्कर मोकाट फिरत आहेत. या सगळ्यांवर नजर ठेवा. ड्रग्स तस्करांची माहिती काढून कारवाई करा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. पुण्यातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना हे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपासून पुण्यात ड्रग्स विक्रीवर पोलिसांची करडी नजर दिसत आहे. त्यातच पुणे पोलिसांनी मागील काही दिवसांत 4000 कोटींचं ड्रग्स जप्त केलं आहे. यात मोठं रॅकेट समोर आलं आहे. त्यामुळे शहरात अजून अनेक ठिकाणी ड्रग्स विक्री सुरु असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गुन्हेगारी थांबवण्यासाठी आयुक्तांनी कंबर कसली!
पुण्यातील गुन्हेगारी वाढत चालली असून ती थांबवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता कंबर कसली आहे. सगळ्या अट्टल गुन्हेगारांची परेड काढल्यानंतर, अशा लहान मोठ्या टोळ्यांवरदेखील पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यांना आधीच आदेश काढून कारवाई करण्याय येणार असल्याची तंबी दिली आहे. त्यासोबतच कोयता गॅंग किंवा तोडफोड करणाऱ्या टोळीची धींडदेखील काढण्यात आली होती. ज्या परिसरात दहशत माजवली त्याच परिसरात धींड काढली होती. मात्र तरीही असे प्रकार थांबताना दिसत नाही आहे. त्यामुळे पोलिसांनी आता सगळे नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर महत्वाची बातमी-