एक्स्प्लोर

Lalit Patil Drus Case : ललित पाटील प्रकरण : संजीव ठाकूरांच्या अटकेची पुणे पोलिसांची वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मागणी

Lalit Patil Drus Case :  डॉ. संजीव ठाकूर (Dr. Sanjiv Thakur) यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करून त्यांना अटक करण्याची परवानगी पुणे पोलिसांकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला मागण्यात आली आहे.

Lalit Patil Drus Case ललित पाटील प्रकरणात संशयाच्याभोवऱ्यात असलेले (lalit patil drug case) पुण्यातील ससून रुग्णालयाचे तत्कालीन डीन डॉ. संजीव ठाकूर (Dr. Sanjiv Thakur) यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करून त्यांना अटक करण्याची परवानगी पुणे पोलिसांकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला मागण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून तसे पत्र वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर करण्यात आलंय. आता वैद्यकीय शिक्षण विभाग यावर काय अभिप्राय देतो?, यावर डॉक्टर संजीव ठाकूर यांच भवितव्य अवलंबून असणार आहे. 

पुणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत डॉ. ठाकूर हे दोषी आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलंय. डॉक्टर ठाकूर यांनी ललित पाटीलवर उपचार करण्याच्या नावाखाली त्याचा ससून रुग्णालयातील मुक्काम जास्तीत जास्त वाढेल यासाठी मदत केल्याच पोलिसांना चौकशीत आढळलं.  त्याचबरोबर ललित पाटीलला त्याच्या टोळीसह ससून रुग्णालयातून ड्रग रॅकेट चालवताना अटक केल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी त्याचे पित्ताशयाचे ऑपरेशन करण्याचा निर्णय डॉक्टर संजीव ठाकूर यांनीच घेतल्याच निष्पन्न झालंय.  या ऑपरेशनसाठी एक्स रे काढताना ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता.
 

ललित पाटील पळून गेल्यानंतर या प्रकरणात अनेकांवर संशयाची सुई वळली होती. त्यात महत्वाचं नाव डॉ. संजीव ठाकूर यांचं होतं. हे प्रकरण समोर आल्यानंतर संजीव ठाकूर यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं होतं आणि काही दिवस त्यांनी पुण्याच्या बाहेर असल्याचं माध्यमांना सांगितलं होतं. मात्र ज्यावेळी पुण्याची कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आणि ललित पाटील प्रकरणाची माहिती घेण्यासाठी घेण्यासाठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली होती. त्यानंतर धंगेकरांनी संजीव ठाकूर यांना सगळी माहिती मागितली असता ही माहिती देण्यातदेखीस टाळाटाळ केल्याचं समोर आलं होतं.

याच प्रकरणासंदर्भात संजीव ठाकूर यांची चौकशी केली असता ते दोषी आढळून आले. त्यांनी ललित पाटीलला आश्रय दिल्याचं पोलिसांच्या चौकशीत आढळून आलं. त्यानंतर त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. त्यांच्यासोबतच अनेकांची चोकशी करण्यात आली. या प्रकरणी कारागृहातील कर्मचाऱ्यालादेखील अटक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याने ललित पाटीलला त्यांच्या भावासोबत बोलण्यासाठी मोबाईल फोन दिल्याचं समोर आलं होतं. आता याच प्रकरणाचे पाळेमुळं शोधण्याचा पुणे पोलीस प्रयत्न करत आहे. येत्या काळात त्यांच्यासोबतच अनेक मोठी नावं पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

इतर महत्वाची बातमी-

Nashik News : त्रासाला कंटाळून शेतमजुराने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांकडून सहा तास रास्ता रोको, शेतमालकाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..सकाळी ७ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 14 January 2025सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, खंडणी प्रकरणात आवाजाचे नमुने गोळा केले
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Embed widget