एक्स्प्लोर

Pune Ajit Pawar News: 'आयटीवाल्यांचं दादा शांतपणे ऐकतात, पण आम्हाला...'; हिंजवडीच्या सरपंचांचे अजित पवारांवर गंभीर आरोप; व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत म्हणाले....

Pune Ajit Pawar News: आता सरपंचांनी थेट अजित पवारांवर गंभीर आरोप करत त्यांची नेमकी मागणी काय आहे हे सांगितलं आहे. त्याचबरोबर गणेश जांभूळकर यांनी अखेर त्यांची भूमिका मांडली आहे.

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिंजवडी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश जांभुळकर यांना गेल्या आठवड्याच चांगलेच खडेबोल सुनावले होते, दौऱ्यावेळी अजित पवारांचा सरपचांना झापतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सरपंच अजित पवारांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यावेळी त्यांनी संताप व्यक्त करत बोलताना दिसले. हिंजवडी गावचे सरपंच गणेश जांभुळकर यांचं नेमकं म्हणणं काय होतं त्यावेळी समोर आलं नाही. पण आता सरपंचांनी थेट अजित पवारांवर गंभीर आरोप करत त्यांची नेमकी मागणी काय आहे हे सांगितलं आहे. त्याचबरोबर गणेश जांभूळकर यांनी अखेर त्यांची भूमिका मांडली आहे. 

अजित पवारांच्या विकास कामांना आमचा विरोध नाही, परंतु ते आम्हाला विचारात घेऊन काम करत नाहीत, असा थेट आरोप त्यांनी अजित पवार यांच्यावर केला असून केवळ ते आयटीयन्स यांचं ऐकतात, आम्हाला बैठकीला बोलावलं जात नाही, मुळात हिंजवडी गावच्या समस्या नसताना नाव हिंजवडीच खराब होत आहे, गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं अनेक मंदिर, शाळा, घरे रोडमध्ये जाणार आहेत, त्यामुळे अजित पवारांना सरपंच गणेश जांभुळकर यांनी हात जोडून विनंती केली आहे, की यापुढे तरी आम्हाला विश्वासात घेऊन हिंजवडीतील कामे करावीत.

सरपंच गणेश जांभुळकर नेमकं काय म्हणालेत?

सरपंचानी त्या व्हायरल व्हिडीओच्या दिवशी काय घडलं हे सांगितलं. ते म्हणाले, अजितदादांकडे मी गावातले प्रश्न मांडायला गेलो होते दादा आमचे दोन रस्ते आहेत. छत्रपती शिवाजी चौक ते डांगे चौक, छत्रपती शिवाजी चौक ते वाकड चौक, या रस्त्यांचे रुंदीकरण थोडं कमी व्हावं. कारण तिथे आमच्या शाळा आहेत आणि ग्रामपंचायती आहेत, तिथे रहिवासी लोक आहेत. जवळपास 200 परिवार तिथे वास्तव्यास आहेत. पुढे गणपती मंदिर आहे, साई मंदिर आहे. स्मशानभूमी आहे. वाकड रोडला देखील दोन-तीन मंदिर आहेत त्यामुळे मी त्या दिवशी दादांना विनंती करायला गेलो होतो. रस्त्याचं थोडं रुंदीकरण कमी करून घ्या, हे दादांना बोलायला गेलो. दादाचं तिथे शाब्दिक झालं. पण ते काय रागवले नाहीत. तो थोडा गैरसमज झाला. त्यामुळे ती बाईट आणि तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. त्यानंतर पुन्हा अजितदादांनी माध्यमासमोर सांगितलं आम्ही कोणावर रागवत नाही, त्यावेळी थोडासा गैरसमज झाला होता. काम करताना आम्हाला विश्वासात घेतला जात नाही. आम्ही दादांना तिथे पहाटे पाच वाजता भेटायला गेलो, ते 6 वाजता येणार आहेत असं समजलं म्हणून आम्ही तिथे जाऊन थांबलो. त्यांना भेटायला पुन्हा वेळ मिळत नाही म्हणून आम्ही आधी जाऊन थांबलो, गावच्या संदर्भातील प्रश्नांवर बोलण्यासाठी तिथे आम्ही त्यांना भेटायला गेलो. दादा आम्हाला विश्वासात घेत नाहीत. दादांना आयटीएन्स वेगळं सांगतात, दादा त्यांचं ऐकतात, ग्रामपंचायत विकासाच्या आड येते असा दादांच्या मनात आमच्याबद्दल चुकीचा मेसेज गेलेला आहे, असे पुढे सरपंच जांभुळकर म्हणालेत.

अजित पवारांच्या दौऱ्यानंतर हिंजवडीकर एकवटले

आयटीनगरी हिंजवडीच्या विकास कामांवरून हिंजवडी ग्रामस्थ आक्रमक झालेत, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मवाळकीची भूमिका घेऊन रस्त्यांविषयी योग्य मार्ग काढावा, अन्यथा आम्हाला न्यायालयात जावं लागेल असा इशारा हिंजवडचे सरपंच गणेश जांभूळकर यांनी दिला आहे, हिंजवडीची दुरावस्था झाल्याने अजित पवारांनी स्वतः लक्ष घालून विकासकामे करून घेत आहेत, सतत वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाकड आणि डांगे चौक च्या दिशेने नव्याने होणाऱ्या रस्त्यावरून ग्रामस्थ आक्रमक झालेत, आज हिंजवडीत ग्रामसभा घेण्यात आली त्यामध्ये ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतलीय, त्यांनी अनेक पर्यायी रस्ते सुद्धा असल्याचं म्हटलय या संदर्भात सोमवारी पी एम आर डी ए कार्यालयात गावकरी एक बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा पीएमआरडीए काय भुमीका घेणार ते पाहावं लागणार आहे.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Embed widget