एक्स्प्लोर

Pune : कात्रजमध्ये 10 ते 12 गॅस सिलेंडरचा स्फोट, 100 सिलेंडरचा अनधिकृत साठा

Pune Latest News : कात्रजजवळ 10 ते 12 गॅस सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. यामध्ये अद्याप कोणतीही जिवितहानी अथवा जखमी झालेले वृत्त नाही

Pune Latest News : कात्रजजवळ 10 ते 12 गॅस सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. यामध्ये अद्याप कोणतीही जिवितहानी अथवा जखमी झालेले वृत्त नाही. मिळालेल्या वृत्तानुसार,  कात्रज, गंधर्व लॉन्सजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतपणे 100 गॅस सिलेंडरचा साठा करण्यात आला होता. यामध्ये अचानक स्फोट झाला. एकामागून एक दहा ते 12 गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे.  या स्फोटामध्ये एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

कात्रजमध्ये अचानक गॅस सिलिंडरच्या स्फोटाचे आवाज ऐकू आले. स्फोट झाला त्यावेळी बाहेर लहान मुले खेळत होती. त्यामुळे एकच धावपळ झाली. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसरातील घरावरील पत्रे उडाले. गाड्या जळून खाक झाल्या. परिस्थितीचे गांभिर्य पाहून परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. परिसरामध्ये रस्ते खूप अरूंद आहेत. त्यामुळे अग्निशामन दलाच्या गाड्यांना पोहचण्यास उशीरा पोहचल्या. सध्या आग आटोक्यात आल्याचे अग्निशामन दलाकडून सांगण्यात आले आहे. घटनास्थळावर सहा अग्निशामन दलाच्या गाड्या आणि चार पाण्याचे बंब आहेत. सध्या आग आटोक्यात आली आहे.  कुलींगचं काम सुरु आहे.

पुण्यातील कात्रज जवळील गंधर्व लॉन्स येथे सायंकाळी सुमारे पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान गॅस सिलेंडरचे मोठे स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटमुळे सदरील गोडाऊनला आग देखील लागली होती. या गोडाऊन मध्ये जवळपास वीस सिलेंडरचा स्फोट एकदाच झाल्याने. आग मोठी भीषण होती. मात्र यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु गोडाऊनचा मालक सागर पाटील आणि त्याच्यासोबत एक इसम किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे . माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या.... गाड्या दाखल झाल्या होत्या. यात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी हा स्पॉट मात्र भीषण होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. घटनेत गोडाऊनचे संपूर्णपणे नुकसान झाले असून. या गोडाउनमध्ये अवैध रित्या सिलेंडर ठेवले असल्याची माहितीदेखील मिळत आहे. दरम्यान गोडाऊनच्या जवळच असलेल्या अनेक गाड्यांचे देखील या स्फोटामुळे नुकसान झाल आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget