Pune News Video: समोस्यात कंडोम आता बर्फात मेलेला उंदीर, पुण्यात चाललंय तरी काय?
Pune News : कायद्याचे उल्लंघन करून नफा कमवण्यासाठी मानवी आरोग्याला धोका होईल, याचा कोणताही विचार न करता बर्फ तयार केला जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे : पुणे तेथे काय उणे असे नेहमीच म्हटले जाते. पुणे हे जगात प्रसिद्ध शहर आहे. पुण्याची सांस्कृतिक राजधानी आणि ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख असतांना दोन दिवसात घडलेल्या घटना पाहता आता पुण्यात चाललंय (Pune News) तरी काय? असे म्हण्याची वेळ आली आहे. कारण समोस्यात कंडोम (Condom In Samosa) सापडल्याची घटना ताजी असताना आता बर्फात मृतावस्थेत उंदीर आढळला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरुये का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
सूर्य दिवसेंदिवस आग ओखतोय, यामुळं अंगाची लाहीलाही होतेय. या उकड्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण विविध शीतपेयांना पसंती देत आहेत. यात तुम्ही बर्फमिश्रीत पदार्थांना पसंती देत असाल तर तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. हे अधोरेखित करणारी बाब पुण्यात घडली आहे. इथं बर्फातचं मृतावस्थेत उंदीर आढळलं आहे. जुन्नर तालुक्यात ही घटना समोर आली आहे. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बर्फ तयार केला जातो. हे बर्फ ऊसाचे गुऱ्हाळ, सरबत, गोळा यांसह अनेक शीतपेयांसाठी वापरात आलं असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं अनेकांच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो.
बर्फाचा दर्जा कायमच ऐरणीवर
बर्फाचा दर्जा हा मुद्दा कायमचं ऐरणीवर असतो, त्यावर शिक्कामोर्तब करणारी ही घटना पुन्हा एकदा समोर आल्यानं अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. निघोज येथील एका आईस फॅक्टरीमधून हा बर्फ विक्रीसाठी येतो. हा बर्फ जिथे साठवणूक केली जाते तिथे आल्याला दावा विक्रेत्यांनी केला आहे. उंदीर आढळल्यानंतर बर्फ फेकून देण्यात आला आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
बर्फात आढळला उंदीर,
— Pallavi Gaikwad (@pallavig585) April 10, 2024
पुण्यात चाललंय तरी काय?#Pune #Food #Maharashtra #Ice pic.twitter.com/a7ykIxC4gk
घडलेल्या प्रकारानंतर नागरिकांकडून संताप
यंदा अत्यंत कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे आपसूकच बर्फाची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. अशा वेळी दूषीत बर्फाचा पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अस्वच्छ ठिकाणी बर्फाचा साठा करून ठेवण्यात येतो. तसेच तयारही करण्यात येत असल्याचे अनेक ठिकाणचे चित्र दरवर्षीच्या उन्हाळ्यातील आहे आहे. खात असलेला बर्फ दूषित आहे की चांगला हे मात्र सर्वसामान्यांना कळत नाही. कायद्याचे उल्लंघन करून नफा कमवण्यासाठी मानवी आरोग्याला धोका होईल, याचा कोणताही विचार न करता बर्फ तयार केला जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दूषीत बर्फ चिंतेचा विषय
दूषीत बर्फामुळे आरोग्यास अपाय होऊ शकतो. उन्हाळ्यात बर्फाच्या साठवणुकीचे व्हिडीओ, उघड्यावरील बर्फ, खाद्यपदार्थांचा दर्जा, स्वच्छता, विक्रेत्याकडून घेतली जाणारी काळजी, असे असंख्य मुद्दे चर्चेत आले आहेत. बर्फाचा पुरवठा प्रामुख्याने बर्फाच्या कारखान्यांतून होतो. हे कारखाने शहराच्या बाहेर असतात. बहुतांश कारखान्यांतील बर्फाचा दर्जा अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) यापूर्वीच तपासला आहे. मात्र, प्रत्यक्ष हा बर्फ प्रत्यक्ष कसा वापरला जातो, हा चिंतेचा विषय ठरला आहे.
हे ही वाचा :
Pune News : समोसामध्ये बटाट्याऐवजी कंडोम, दगड आणि तंबाखू ; पुण्यातील किळसवाण्या प्रकाराने खळबळ