एक्स्प्लोर

Pune NCP: पुण्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नवीन शहराध्यक्ष; मानकरांच्या राजीनामानंतर 'या' दोन नेत्यांना दिली संधी

Pune NCP: दीपक मानकर यांनी दिलेल्या राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या जागी पक्षातील दोन नेत्यांना संधी दिली आहे.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांनी आपल्या पदाचा 14 मे रोजी राजीनामा दिला होता. समाज कंटकाकडून आपली राजकीय बदनामी केली जात असल्याचं म्हणत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक कटकारस्थान करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला होता. दीपक मानकर यांनी दिलेल्या राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या जागी पक्षातील दोन नेत्यांना संधी दिली आहे.  आमदार सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नवीन शहराध्यक्ष असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आता पुणे शहराला दोन शहराध्यक्ष निवडले आहेत. माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे पूर्व पुणे शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सुभाष जगताप यांच्याकडे शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

'या' नेत्यांच्या नावाची सुरू होती चर्चा

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवीन शहराध्यक्षाची घोषणा होण्यापूर्वी अनेक नावांची चर्चा सुरू होती. सुरुवातीला या रिक्त झालेल्या शहराध्यक्ष पदासाठी आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांची नावे चर्चेत होती. आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे यांनी स्वतःला शहराध्यक्ष पदापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात होतं. तर शहराध्यक्षपदाच्या रेसमध्ये माजी महापौर दत्ता धनकवडे आणि माजी सभागृह नेते सुभाष जगताप हे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादीकडून  माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे पूर्व पुणे शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सुभाष जगताप यांच्याकडे शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मानकरांनी का दिला राजीनामा?

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यावर बनावट कादगपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष राहिलेल्या शंतनू कुकडेला पुणे पोलीसांनी बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने आणि मोठ्या प्रमाणावर पैशांचा व्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्याने पोलीसांनी शंतनू कुकडे याच्या बँक खात्यांची पडताळणी केली. त्यावेळी शंतनू कुकडे आणि दिपक मानकर यांच्यात एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे आढळून आले होते. दरम्यान बनावट कागदपत्र फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दीपक मानकर यांच्याकडून पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्यात आला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये माझ्या राजकीय आलेख पाहता आणि पक्षाची मजबूत स्थिती पाहता बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने राजीनामा दिल्याचा उल्लेख त्यांनी राजीनामा पत्रात करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: पाऊस अचानक का थांबला, पुन्हा कधी कोसळणार?; भारतीय हवामान विभागाने सांगितली A टू Z माहिती
पाऊस अचानक का थांबला, पुन्हा कधी कोसळणार?; भारतीय हवामान विभागाने सांगितली A टू Z माहिती
Pune Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनाग्रस्त इमारत 'कशी' होती? फोटो आला समोर; अगदी कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागूनच उभारली होती देखणी वास्तू
मोशी दुर्घटनाग्रस्त इमारत 'कशी' होती? फोटो आला समोर; अगदी कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागूनच उभारली होती देखणी वास्तू
Jejuri Warkari Accident: जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताला पोलीस प्रशासनाचा नियोजन शून्य कारभारच जबाबदार; वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप
जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताला पोलीस प्रशासनाचा नियोजन शून्य कारभारच जबाबदार; वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: पाठीमागून मोठा ट्रक आला, सगळ्यांना धडाधड पाडत अंगावरुन गेला; माऊलींच्या पालखीत काय घडलं?, प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
पाठीमागून मोठा ट्रक आला, सगळ्यांना धडाधड पाडत अंगावरुन गेला; माऊलींच्या पालखीत काय घडलं?, प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
Embed widget