एक्स्प्लोर

माझा पुतण्या पळून गेला नाही, त्यानं मद्यप्राशनही केलेलं नव्हतं; पुतण्याच्या अपघातानंतर आमदार मोहिते पाटलांचा दावा

Pune Nashik Highway Accident: पुतण्याच्या अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी दावा केला आहे. माझा पुतण्या अपघातानंतर पळून गेलेला नाही, त्यानं मद्यप्राशनंही केलेलं नव्हतं, असं दिलीप मोहिते पाटील म्हणाले आहेत.

Pune Accident News: पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway Accident) कळंब येथे दुचाकी आणि कारचा अपघात झाला. महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे, आमदाराच्या पुतण्यानं बेदरकारपणे (Pune Accident Updates) गाडी चालवून दोघांना चिरडल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील खेड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांचा पुतण्या मयुर मोहिते (Mayur Mohite) यानं आपल्या चारचाकी गाडीनं दोघांना उडवलं. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचसंदर्भात आमदार दिलीप मोहिते पाटलांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही, त्यानं मद्यपानही केलेलं नव्हतं, असा दावा आमदार दिलीप मोहितेंनी केला आहे. 

पुण्यातील पोर्शे अपघातानंतर आणखी एक भीषण अपघात पुण्यात झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्यानं आपल्या कारनं दोघांना चिरडलं. आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. मेडिकल रिपोर्टमध्ये नेमकं काय आढळतं याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अपघातानंतर मयूर मोहिते पाटील गाडीतच बसून राहिला, तो गाडीबाहेर आलाच नाही, असं स्थानिकांनी सांगितलं आहे. यासर्व चर्चांवर मोहिते पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

पुण्यातील खेड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, "अपघातानंतर माझा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते हा कुठं ही पळून गेला नाही. शिवाय त्यानं मद्यपानही केलेलं नव्हतं."  

झालेली गोष्ट 100 टक्के चुकीची : आमदार दिलीप मोहिते पाटील 

"माझा पुतण्या नारायणगाव मार्गे कळंबवरुन खेडकडे येत होता. अपघात का झाला? कुठे झाला? त्यावेळी अंधार होता, त्यामुळे कसा झाला? याबाबत कुणालाच काहीच कल्पना नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पोलीस सगळ्या प्रकारची चौकशी करत आहेत. झालेली गोष्ट 100 टक्के चुकीची आहे. मी मृत तरुणाच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. मी वातावरण शांत झालं की, स्वतः कुटुंबाची भेट घेणार आहे. मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही, करणार नाही." 

माझा पुतण्या आयुष्यात कधीही दारू प्यायलेला नाही, तो दारू पित नाही : आमदार दिलीप मोहिते पाटील 

"माझा पुतण्या आयुष्यात कधीही दारू प्यायलेला नाही, तो दारू पित नाही. तो इंजिनिअर आहे, तो दारू पित नाही. तो उद्योजकदेखील आहे. त्यामुळे असले प्रकार त्यानं त्याच्या आयुष्यात केलेले नाहीत.", असं मोहिते पाटील म्हणाले आहेत. तसेच अपघात झाला त्या ठिकाणी कुणीच नव्हतं. त्यामुळे प्रथमदर्शनी चूक नेमकी कुणाची? हे अजून पोलिसांनी मला सांगितलेलं नाही. पोलीस ज्यावेळी माहिती देतील, त्यावेळी मी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल, असं मोहिते पाटील म्हणाले. 

माझा पुतण्या अद्याप पोलिसांच्या ताब्यात, तो पळून गेलेला नाही : आमदार दिलीप मोहिते पाटील

आमदार पुतण्या अपघातानंतर तिथून निघून गेला, त्यानं अपघातग्रस्तांना कोणतीही मदत केलेली नाही. तसेच, अपघातावेळी त्यांनी मद्यप्राशन केलं होतं. त्यावर बोलताना दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, "माझा पुतण्या अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस अजूनही चौकशी करतील, पोलिसांनी माझ्या पुतण्याचे वैद्यकीय तपासणीसाठी सॅम्पल्स घेतलेले आहेत. अपघातग्रस्त तरुणाला माझ्या पुतण्यानं अॅम्बुलन्समध्ये टाकलं आहे. त्यामुळे इतर आरोपांत मला तथ्य वाटत नाही. पण मी अपघातस्थळी नव्हतो. त्यामुळे यासर्व घडामोडींची मी नक्कीच शहानिशा करीन." 

कसा घडला अपघात? 

आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्यानं बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना आपल्या गाडीनं चिरडलं. या घटनेत ओम भालेराव (वय 19 वर्ष) तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारनं पुण्याच्या दिशेनं येत होता. तो विरुद्ध दिशेनं सुसाट गाडी चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या भरधाव कारनं धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पाहा व्हिडीओ : Dilip Mohite Patil:अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही,त्याने मद्यपान ही केलं नव्हतं

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं, नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 February 2025Rinku Rajguru Kolhapur | कोल्हापुरात आर्ची आली, फोटोमुळं चर्चा झाली! Special ReportTanaji Sawant Son Kidnapping| कहाणी नेत्याच्या लेकाच्या अधुऱ्या बँकॉक वारीची ABP MajhaBharat Gogawle on Palakmantripad : पालकमंत्रिपदावरून तिन्ही पक्षात धुसफूस सुरूच Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
Embed widget