Pune Monsoon Update: सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम; धरण पातळीत थोड्या प्रमाणात वाढ
पुण्यात सलग दोन दिवसांपासून पावसाचा माध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आणि बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
Pune Monsoon Update: पुण्यात सलग दोन दिवसांपासून पावसाने माध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आणि बळीराजाला दिलासा मिळाला आहे. आठवडाभार पावसाचा जोर कायम असेल असा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. पुण्याजवळील घाट परिसरात आणि धरण परिसरात संततधार पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात आज (6 जुलै) ते 9 जुलै या कालावधीत मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, गोवा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रासाठी अत्यंत मुसळधार पावसासह जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा, पुणे, नाशिक घाट परिसरात असाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. सातारा, पुणे, नाशिक घाट परिसरात असाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्याही कोल्हापुरात तैनात आहेत.
पुणे शहरात आजपासून पावसाची तिव्रता वाढण्याची शक्यता आहे. सोमवार 4 जूलैला शहरातील अनेक परिसरात पावसाने हजेरी लावली होती. पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने शहरात ढगाळ वातावरण आहे. पुणेकर पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मुंबई- आणि कोकण भागात पावसाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे पुण्यातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोव्यात देखील पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणाला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
7 जुलैपर्यंत पुणे शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जारी केला आहे. IMD च्या मते 6 जुलैपासून पुढील काही दिवसांपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शनिवार (6 जुलै) पासून, कमकुवत मान्सूनच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. पुन्हा आजपासून काही दिवस मान्सून जोरदार सक्रिय होण्याची शक्यता आहे, हवामान आणि वायु प्रदूषण मॉनिटरिंग युनिट, भारतीय हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.