एक्स्प्लोर
मतदानापूर्वी 'गुड न्यूज', मात्र रुपाली पाटलांना निवडणुकीत बॅड न्यूज
पुणे : प्रचारादरम्यान 'गुड न्यूज' मिळालेल्या मनसे नगरसेविकेला विजयाची 'गुड न्यूज' मिळालेली नाही. पुण्यातील नगरसेविका रुपाली पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भाजप उमेदवाराकडून पाटील यांना पराभवाची धूळ चाखावी लागली.
पुण्यातील मनसेच्या विद्यमान नगरसेविका आणि प्रभाग क्रमांक 15 मधुन निवडणूक लढवत असलेल्या रुपाली पाटील गरोदर होत्या. प्रभागात अटीतटीची निवडणूक असल्यामुळे त्यांनी प्रभागात जोरदार प्रचार केला. मात्र प्रचार सुरु असतानाच त्यांना प्रसववेदना सुरु झाल्या.
रुपाली पाटील यांना मनसे कार्यकर्त्यांनी प्रसुतिगृहात दाखल केलं असता त्यांना मुलगा झाला. ज्या दोन निकालांची रुपाली पाटील आतुरतेने वाट पाहत होत्या, त्यापैकी एकाचा सुखद निकाल लागला, मात्र निवडणुकीचा निकाल त्यांच्यासाठी कटु ठरला आहे.
प्रचारादरम्यान पुण्यातील मनसे नगरसेविकेला मुलगा झाला!
पुण्यात भाजपने 162 पैकी 94 जागा मिळवत निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी पुण्यात 40 जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसला 11, तर शिवसेनेला 10 जागांवर समाधान मानावं लागलं. मनसेचे केवळ दोनच उमेदवार पुण्यात निवडून आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
नाशिक
पुणे
Advertisement