Pune Mahalakshmi Devi: दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
Pune Mahalakshmi Devi: देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. देवीला परिधान केलेली ही सोन्याची साडी दक्षिण भारतातील कारागिरांनी तयार केलेली आहे.
पुणे: विजयादशमीनिमित्त पुण्यातील सारसबाग परिसरातील श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या मूर्तीला तब्बल 17 किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे. देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. देवीला परिधान केलेली ही सोन्याची साडी दक्षिण भारतातील कारागिरांनी तयार केलेली आहे. 21 वर्षांपूर्वी देवीच्या मुर्तीसाठी ही सोन्याची साडी तयार करण्यात आली होती. अनेक कारागिरांनी जवळपास सहा महिने ही साडी तयार करण्याचे काम केले होते. त्यानंतर ही साडी पूर्ण झाली आहे. (Pune Mahalakshmi Devi Wears 17 Kg Gold Saree for Vijaya Dasami Dusshera)
महालक्ष्मी देवीसाठी एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. वर्षभरातून दोन वेळेस म्हणजे दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसवली जाते. देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता भाविकांची चांगलीच गर्दी होते. साडीवर आकर्षक अशा प्रकरचं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. 17 किलो सोन्याची साडी परिधान केलेले श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि देव देवीला पाहण्यासाठी भक्तांकडून दरवर्षी गर्दी केली जाते. यावर्षी दसऱ्यानिमित्त सकाळपासून अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.(Pune Mahalakshmi Devi Wears 17 Kg Gold Saree for Vijaya Dasami Dusshera)
स्वारगेट परिसरातील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिराची निर्मिती 1984 मध्ये करण्यात आली होती. मंदिरात मनमोहक श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी आणि श्री महाकाली देवीची मूर्ती आहे. आज विजयादशमीनिमित्त भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळच्या सुमारास गर्दी केली आहे. वर्षभरातून केवळ दोन वेळा देवीला ही सोन्याची साडी परिधान करण्यात येते. दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला परिधान करतात. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी गर्दी केली.