Pune Loksabha Election Result : काय म्हणता पुणेकर, निवडून आले मुरलीधर; मोहोळांच्या कार्यकर्त्यांनी धंगेकरांना डिवचलं!
काय म्हणता पुणेकर निवडून येणार धंगेकर, असा नारा दिला होता. याच नाऱ्यावरुन आता धंगेकरांना मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यांनी डिवचलं आहे. कॉंग्रेस भवनच्या दारावरच हे बॅनर लावले आहेत.
![Pune Loksabha Election Result : काय म्हणता पुणेकर, निवडून आले मुरलीधर; मोहोळांच्या कार्यकर्त्यांनी धंगेकरांना डिवचलं! Pune Loksabha Election Result Murlidhar Mohol activists beat Rvaindra Dhangekar On poster Pune Loksabha Election Result : काय म्हणता पुणेकर, निवडून आले मुरलीधर; मोहोळांच्या कार्यकर्त्यांनी धंगेकरांना डिवचलं!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/04/e1284ff6886c70bb8b27941761e1036e1717493968731442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुणे लोकसभा मतदार संघात चुरशीली लढाई होती. मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत होती. यंदाच्या प्रचारादरम्यान दोघांनी एकमेकांवर टीका केली मात्र धंगेकरांच्या घोषणेची किंवा नाऱ्याची चांगलीच चर्चा रंगली. काय म्हणता पुणेकर निवडून येणार धंगेकर, असा नारा दिला होता. याच नाऱ्यावरुन आता धंगेकरांना मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यांनी डिवचलं आहे. कॉंग्रेस भवनच्या दारावरच हे बॅनर लावले आहेत.
मोहोळांचा विजय निश्चित दिसत आहे. पहिल्या फेरीपासून मोहोळ यांनी आघाडी कायम ठेवली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली. काय म्हणता पुणेकर निवडून येणार धंगेकर अशी घोषणा संपूर्ण प्रचारादरम्यान धंगेकर देत होते. आता मात्र मोहोळ आघाडीवर असल्याने मोहोळांच्या कार्यकर्त्यांनी थेट काय म्हणता पुणेकर निवडून आलाय मुरलीधर, असं बॅनर लावून धंगेकरांना डिवचलं.
या प्रचारादरम्यान रवींद्र धंगेकरांच्या या नाऱ्याची सर्वत्र चर्चा रंगली. लहानग्यांपासून ते वयस्कर पुणेकरांच्या तोंडात हा नारा गेले दोन महिने होता. सोशल मीडियावरदेखील या नाऱ्याचे रिल्स, व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले होते. धंगेकरांनी आणि त्यांच्या प्रचारासाठी आलेल्या अनेकांनी हाच नारा दिला. काय म्हणता पुणेकर निवडून येणार धंगेकर, अशी घोषणा धंगेकरांच्या प्रत्येक सभेत घुमली. त्यानंतर आता याच नाऱ्याची खिल्ली भाजपच्या कार्यकर्त्यांनी उडवली आहे.
मोहोळांचा विजय निश्चित
पुणे लोकसभा मतदार संघात भाजपच्या मुरलीधर मोहोळांची (Murlidhar Mohol) जादु चालली आहे. पुणे लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का बसला आहे. मुरलीधर मोहोळ थेट ६६,९०६ मतांनी आघाडीवर आहे. ही आघाडी पाहताच मुरलीधर मोहोळांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले आहेत. गुलाल उधळत जल्लोष होत आहे. पुण्यातला पैलवान दिल्लीला जाणार, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहेत. पुण्यात लोकसभेसाठी तीन पैलवान मैदानात उतरले होते. कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर,भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि वंचितचे वसंत मोरे रिंगणात उतरले होते. त्यात कोणता पैलवान बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यात आता मुरलीधर मोहोळांनी मुसंडी मारत डाव आपला करुन घेतल्याचं आघाडीवरुन दिसत आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)