Pune Loksabha Election Result : मुरलीधर मोहोळांचा विजय निश्चित; पुण्याचा पैलवान दिल्लीत जाणार, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणा
पुणे लोकसभा मतदार संघात भाजपच्या मुरलीधर मोहोळांची (Murlidhar Mohol) जादु चालली आहे. पुणे लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का बसला आहे.
पुणे : पुणे लोकसभा मतदार संघात भाजपच्या मुरलीधर मोहोळांची (Murlidhar Mohol) जादु चालली आहे. पुणे लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का बसला आहे. मुरलीधर मोहोळ थेट ६६,९०६ मतांनी आघाडीवर आहे. ही आघाडी पाहताच मुरलीधर मोहोळांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले आहेत. गुलाल उधळत जल्लोष होत आहे. पुण्यातला पैलवान दिल्लीला जाणार, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहेत. आम्हाला विश्वास होता अण्णा निवडून येतील, अशी भावना मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर उभे ठाकले होते. दोघांमध्ये चुरशीची लढत होती. तगडी फाईट असल्याने पुण्यात खासदार नेमका कोण होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी दोघांनीही थेट आम्हीच जिंकणार असल्याचा दावा केला. य प्रचारादरम्यान धंगेकरांनी मोहोळांवर आणि भाजपवर अनेकदा टीका केली. मात्र आता मुरलीधर मोहोळ थेट ६६,९०६ मतांनी आघडीवर आहेत. त्यामुळे मोहोळ आता विजयाची वाटचाल करताना दिसत आहे.
मुरलीधर मोहोळांना जिंकून आणण्यासाठी भाजपची मोठी फळी कामाला लागली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील पुण्यात प्रचारासाठी आले होते. त्यांच्या प्रचारसभेचा मुरलीधर मोहोळांना मोठा फायदा झाल्याचं बोललं जात आहे. त्यासोबत RSS आणि भाजपची राज्यातले महत्वाचे नेत्यांनी पुण्यात ठाण मांडलं होतं. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे मतदानापुर्वी दोन दिवस पुण्यात आले होते. या सगळ्यांच्या मेहनतीला फळ मिळताना दिसत आहे. पहिल्या फेरीपासून मोहोळ हे आघाडीवर आहेत आणि धंगेकर पिछाडीवर दिसत आहेत.
पुण्याचा पैलवान दिल्लीत जाणार
पुण्यात लोकसभेसाठी तीन पैलवान मैदानात उतरले होते. कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर,भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि वंचितचे वसंत मोरे रिंगणात उतरले होते. त्यात कोणता पैलवान बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यात आता मुरलीधर मोहोळांनी मुसंडी मारत डाव आपला करुन घेतल्याचं आघाडीवरुन दिसत आहे. त्यामुळे पुण्याचा पैलवान आता दिल्लीत जाणार, अशा घोषणा करण्यात येत आहे. मुरलीधर मोहोळांच्या कार्यलयासमोर जल्लोष साजरा करण्यात येत नाही.
इतर महत्वाची बातमी-