एक्स्प्लोर

Pune political News : गणेशोत्सवाच्या शुभेच्छा की खासदारकीची तयारी? पुण्यात 'या' नेत्याचे पुन्हा भावी खासदारचे बॅनर

भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहे. या बॅनरच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपला भावी खासदार म्हणून संदेश देण्याचे काम मुळीक यांनी केले आहे.

पुणे : गिरीट बापट यांच्या निधनानंतर पुण्यात लोकसभा पोटनिवडणूक होणार (Pune Political news) असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, पोटनिवडणुक (Bypoll elections) होण्याचे कोणतेही चिन्हे अजून दिसत नाही. त्यामुळे आता थेट 2024 मध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच पुण्यातील भाजप  (BJP) नेत्यांकडून उमेदवारी दावा करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहे. या बॅनरच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपला भावी खासदार म्हणून संदेश देण्याचे काम जगदीश मुळीक यांनी केले आहे. यातून त्यांचे लोकसभा निवडणुकीची तयारीचे संकेत दिसत आहेत. 

आम्हीच निवडून येणार...

पोटनिवडणुक घ्यायची किंवा नाही घ्यायची हा अधिकार फक्त निवडणूक आयोगाचा आहे. निवणुकीच्या बाबतीत सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही. पुण्यात कधीही निवडणूक लागू द्या. आम्हीच निवडून येऊ, असा दावाही मुळीकांनी केला आहे. पुणेकर जनता सुज्ञ आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात आणि महत्वाचं म्हणजे पुण्याच्या विकासासाठी भाजप कायमच प्रयत्नशील असतं, हे पुणेकरांना चांगलं माहित आहे, असंही ते म्हणाले. यापूर्वीही गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर जगदीश मुळीक यांच्या समर्थकांनी मुळीकांचे भावी खासदार म्हणून बॅनर्स लावले होते. संपूर्ण पुण्यात त्यांनी बॅनरबाजी केली होती. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या या बॅनर वर त्यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख केला होता. त्यावेळी देखील त्यांनी खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

इच्छुकांची रांग

पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्यांची इच्छुकांची रांग लागली आहे. त्यात लोकसभेसाठी गिरीश बापट यांच्या परिवारातून स्वरदा बापट यांचे नाव आगामी उमेदवार म्हणून घेतले जात आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुळकर्णी, माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. 

इतर महत्वाची बातम्या

Pune Ganeshotsav : देवेंद्र फडणवीसांचा आज पुण्यात 'मंडळ टू मंडळ' दौरा, दगडूशेठ चरणी होणार लीन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Attacked : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रमZero Hour Vidhan Sabha Election | मतदानाआधीच राजकीय महाभारत, निवडणूक आयोगाकडून किती कोटी जप्त?Devendra Fadnavis on Deshmukh | सलीम जावेदची स्क्रिप्ट, रजनिकांतची फिल्म, फडणवीसांचा देशमुखांवर नेमVinod Tawde On Cash Controversy: टीप नव्हतीच..हितेंद्र ठाकूर खोटं बोलतायत, तावडेंची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget