एक्स्प्लोर

Khadakwasla Dam : बारशाला आलेल्या मुलींचा खडकवासला धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर, नऊ मैत्रिणी बुडाल्या, दोघींचा मृत्यू

Pune News: खडकवासला धरण परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मुली बुडाल्या  आहेत. या नऊ मुलींपैकी सात मुलींना बाहेर काढण्यात यश आले आहे. परंतु दोन मुलींचा मृत्यू झाला आहे.  

पुणेखडकवासला धरण (Khadakwasla Dam) परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मुली बुडाल्या  आहेत. या नऊ मुलींपैकी सात मुलींना बाहेर काढण्यात यश आले आहे. परंतु दोन मुलींचा मृत्यू झाला आहे.  गोऱ्हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत  ही घटना घडली आहे. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले तर दोन मुली अद्याप सापडल्या नाहीत. हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान दाखल होत आहेत.

कलमाडी फार्म हाऊसजवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी नऊ मुली पोहण्यासाठी उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व नऊ मुली पाण्यात बुडू लागल्या. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली. दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. 

दोघींच्या मृत्यूने परिसरात हळहळ

खुशी संजय खुर्दे (वय 14 वर्ष ), शीतल भगवान टिटोरे (वय 15 वर्ष)  या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे.  पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या या सगळ्या मुली बुलढाणा जिल्ह्यातील असून पुण्यातील गोरे खुर्द गावात त्यांच्या नातेवाईकाकडे बारशाचा कार्यक्रमाला आल्या होत्या. या दोघींच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.     

सुरक्षा सुविधा कधी उभारणार?

खडकवासला आणि पानशेत धरण परिसरात आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहे. सुरक्षेसाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक उत्साही तरुणांचा जीव जात आहे. कोणतीही अनुचित घटना घडली तर धरणाचं अंतर शहरापासून दूर असल्यामुळे पोहचायला परिणामी उशीर होतो. त्यामुळे अनेक घटनांमध्ये मृत्यू झाले आहेत, असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पर्यटकांनीही सावधगिरी बाळगली पाहिजे आणि खोल पाण्यात उतरु नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. येत्या काळात अशा घटना घडू नयेत यासाठी आता अधिकाऱ्यांनी पावले उचलणे आणि सुविधा उपलब्ध करुन देणं गरजेचं आहे. प्रत्येक पर्यटकाला कोणतीही चिंता न करता निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे.

दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज

खडकवासला परिसरात अनेक ठिकाणी घातक क्षेत्र आहे. या सगळ्या क्षेत्रात योग्य संरक्षण भिंत किंवा फलक लावण्याची गरज आहे. अनेकांचा मृत्यू होऊनही कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. पाटबंधारे विभाग, पोलीस प्रशासन किंवा इतर विभागामार्फत हे अपघात किंवा दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget