एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट, सिरीयामधून मिळत होत्या सूचना; तपासात धक्कादायक माहिती समोर

एनआयने पुणे पोलिसांचे कौतुक करणारे पत्र पाठवले. या पत्रात तपासात उघड झालेल्या घातपातच्या कटाची माहिती देण्यात आली आहे. 

पुणे : पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा  दहशतवाद्यांचा कट होता. दहशतवाद्यांना सिरीयामधून त्यासंदर्भात सूचना मिळत होत्या, इसिस मॉड्युलप्रकरणी (ISIS) तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.  पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) नुकत्याच पकडलेल्या दहशतवाद्याकडून तपासात ही खळबळजनक माहिती समोर आल आहे. 

पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात ही आठवी अटक आहे.  दहशतवाद्यांना अटक करून ‘इस्लामिक स्टेट’चे (आयएस) महाराष्ट्र मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात यश मिळाले आहे. मोहम्मद शाहनवाझ आलमला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली.  पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा थेट संबंध  होता. पुण्यातील कोथरूड परिसरात 19 जुलै 2023  रोजी महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी याच्यासह शाहनवाझ आलमला दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना पुणे पोलिसांनी पकडले होते. परंतु घरझडती घेण्यासाठी जात असताना शहानवाझ कोंढवा परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. एनआयने पुणे पोलिसांचे कौतुक करणारे पत्र पाठवले. या पत्रात तपासात उघड झालेल्या घातपातच्या कटाची माहिती देण्यात आली आहे. 

दहशतवादी कारवाया करण्याचा रचला होता कट

आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि इतरांसह अनेक राज्यांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला असल्याची माहिती देण्यात आलीये. दरम्यान त्यांच्या या कारवायांमुळे अनेक विघातक कृत्ये होण्याची शक्यता होती. तसेच एनआयएने केलेल्या तपासात आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि सध्या सुरू असलेल्या प्रकरणात आयएसआयएस  हँडलर्सचा सहभाग असल्याचं उघड करण्यात आलं आहे.   भारतामध्ये ISIS च्या अतिरेकी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी एक मोठे नेटवर्क देखील या तपासात उघड झालं आहे. 

पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते

‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’शी संबंधित मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय 24 वर्षे), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय 23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) या दोन दहशतवाद्यांचा दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून स्फोट करण्याचा डाव होता, असे ‘एनआयए‘च्या तपासात आढळलं आहे. खान, साकी यांच्याकडून बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱ्या रंगाच्या गोळय़ा, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकीट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  हे दोघं 15 महिन्यापासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचं साहित्य जप्त केलं आहे. यात शहरातील संवेदनशील ठिकाणांचे चित्रीकरण केल्याचंदेखील समोर आलं आहे. या चित्रीकरणात नेमकं काय आहे? पुण्यातील कोणत्या परिसरातील चित्रीकरण केलं आहे आणि यात पुण्यातील बाहेरचं चित्रीकरण केलं आहे का?, या सगळ्याचा तपास पोलीस करत आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde PC : भाजपचाच मुख्यमंत्री होणार,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचाच मुख्यमंत्री होणार, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
Glenn Maxwell on Yashasvi Jaiswal : यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
Apex Ecotech IPO : अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपी पोहोचला 48 टक्क्यांवर गुंतवणूकदारांना मोठी संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Narendra Modi | नरेंद्र मोदी, अमित शाहा जे निर्णय घेतली तो अंतिम असेल- एकनाथ शिंदेEknath Shinde on Uddhav Thackeray | सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना कशी गरीबी कळणार- शिंदेEknath Shinde on CM Post | पायाला भिंगरी लावून मी कार्यकर्त्यांप्रमाणे काम केलं- एकनाथ शिंदेABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 27 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde PC : भाजपचाच मुख्यमंत्री होणार,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचाच मुख्यमंत्री होणार, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
Glenn Maxwell on Yashasvi Jaiswal : यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
Apex Ecotech IPO : अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपी पोहोचला 48 टक्क्यांवर गुंतवणूकदारांना मोठी संधी
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
Embed widget