एक्स्प्लोर

Pune Weather Update : पुण्यात हुडहुडी वाढणार! महाबळेश्वरपेक्षा पुणे गार; पुढील काही दिवस वातावरण कसं असेल?

हिवाळ्याला अजून सुरुवातच व्हायची आहे मात्र पुणे शहरात थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. कालपासून (27 ऑक्टोबर) पुण्यातील तापमानात घट झाली आहे.

पुणे : हिवाळ्याला अजून(Pune Weather Update) सुरुवातच व्हायची आहे. (Pune news) मात्र पुणे शहरात थंडी (Winter) जाणवायला सुरुवात झाली आहे. कालपासून पुण्यातील तापमानात घट झाली आहे. महत्वाचं म्हणजे महाबळेश्वरपेक्षाही पुण्यात तापमान कमी नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे पुणेकरांना ऑक्टोबर हिटपासून दिलासा मिळाला आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, महाबळेश्वरमध्ये किमान तापमान 15.6 अंश सेल्सिअस, तर पुण्यात 14.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

शहरात उत्तरेकडील थंड वारे वाहू लागल्याने तापमानात लक्षणीय घट दिसून येत आहे. शुक्रवारी (27 ऑक्टोबर) शिवाजीनगर येथे हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली, तर पाषाण येथे शहरातील रात्रीचे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले. तापमान कमी होण्यास सुरुवात झाली असली तरी महाराष्ट्रात अद्याप हिवाळा सुरू झालेला नाही, असे भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या 3-4 दिवसांत शहरातील कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे, असंही ते म्हणाले.

IMD च्या आकडेवारीनुसार, पाषाणमध्ये गेल्या 24 तासांत किमान तापमानात 3 अंश सेल्सिअसची घट नोंदवली गेली आहे. 26 ऑक्टोबर रोजी ते 15.7 अंश सेल्सिअसवरून 27 ऑक्टोबर रोजी 12.2 अंश सेल्सिअसवर घसरले आहे. त्याचप्रमाणे लोहेगाव, कोरेगाव पार्क, हडपसर आणि मगरपट्टा भागातही रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. त्याचवेळी शिवाजीनगरमध्ये या हंगामातील नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली आहे. आकडेवारीनुसार, शिवाजीनगरमध्ये रात्रीचे तापमान 14.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्य तापमानापेक्षा 2 अंशाने कमी आहे. या भागात कमाल तापमान 31.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आणि राज्यात जळगावमध्ये राज्यातील सर्वात कमी तापमान 10.9 अंश सेल्सिअस नोंदले गेले

पुण्यात विविध ठिकाणी किमान तापमान

चिंचवड-19.6
कोरेगाव पार्क -18.9
हडपसर -17.3
शिवाजीनगर -14.4
पाषाण -12.8

पुणं गारठणार, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात घट...

हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुणेकरांना ऑक्टोबर हिटनंतर (october heat)थंडीचा सामना करावा लागणार आहे. पुढील दोन दिवस थंडी वाढणार आहे. मागील काही दिवस पुण्यात उन्हाचे चटके जाणवत होते. या उन्हामुळे पुणेकर हैराण झाले होते. मात्र आता पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे. त्यासोबतच विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा किंचित खाली घसरलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Nirmala Nawale : कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंची मोठी झेप; राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड
कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंची मोठी झेप; राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Paraded Case : अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget