एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यात एमआरआयसाठी आलेल्या महिलेचा अश्लील व्हीडिओ चित्रित, वॉर्डबॉयला बेड्या
रुममध्ये कपडे बदलत असताना आपला कोणीतरी व्हीडिओ काढत असल्याचा प्रकार संबंधित महिलेच्या लक्षात आला. तिने लगेचच ही बाब आपल्या पतीला सांगितली. पतीने या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली.
पुणे : पुण्याच्या प्रसिद्ध जहांगिर रुग्णालयात एमआरआय काढण्यासाठी आलेल्या एका महिलेचा कपडे बदलताना व्हीडिओ चित्रित केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वॉर्डबॉयला बेड्या ठोकल्या आहेत.
शनिवार रात्रीच्या सुमारास पोट दुखत असल्याने संबंधित महिला एमआरआय काढण्यासाठी रुग्णालयात आली होती. त्यावेळी तिथल्या वॉर्डबॉयने महिलेला एका रुममध्ये कपडे बदलायला पाठवले. तेव्हा वॉर्डबॉयने तिचा व्हीडिओ चित्रित केला.
रुममध्ये कपडे बदलत असताना आपला कोणीतरी व्हीडिओ काढत असल्याचा प्रकार संबंधित महिलेच्या लक्षात आला. तिने लगेचच ही बाब आपल्या पतीला सांगितली. पतीने या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली.
तसेच पतीने रुग्णालय प्रशासनाकडेही या घटनेची तक्रार केली. पण रुग्णालय प्रशासनाकडून याबद्दल कोणतीही दखल घेतली गेली नाही. अखेर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संबंधीत आरोपीला अटक केली आहे. तसेच कोरेगाव पार्क पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.
जहांगीर रुग्णालयाचे स्पष्टीकरण
जहांगीर रुग्णालयाने एक पत्र काढून यामध्ये आरोपी लंकेश ऊतेकर हा जहांगीर रुग्णालयाचा कर्मचारी नाही. तो साफसफाई करण्यासाठी नेमलेल्या एंजसीचा कर्मचारी असल्याचे पत्रात नमूद केले आहे. एमआरआय रुममध्ये मोबाईल बाळगण्याची परवानगी नसतानाही त्याने मोबाईल नेला होता. याप्रकरणी आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत. तसेच संबंधित एजन्सीसोबत असलेला करारही रद्द करणार आहोत. जहांगीर हॉस्पिटलची 73 वर्षाची विश्वासाची परंपरा आम्ही यापुढेही कायम ठेऊ. रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सर्व रुग्णांची माफी मागण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांना आम्ही संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे जहांगीर रुग्णालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement