Pune Holi special Train : होळीच्या प्रवासाची चिंता मिटली; पुण्यातून 'या' शहरात जाण्यासाठी विशेष रेल्वे
मध्य रेल्वेने होळीनिमित्त (Railway) विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. होळीच्या सणाला (Holi special train) होणारी वाहतूक कमी व्हावी आणि प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
![Pune Holi special Train : होळीच्या प्रवासाची चिंता मिटली; पुण्यातून 'या' शहरात जाण्यासाठी विशेष रेल्वे Pune Holi special Train Pune to Danapur, Gorakhpur and Muzaffarpur train railway Pune Holi special Train : होळीच्या प्रवासाची चिंता मिटली; पुण्यातून 'या' शहरात जाण्यासाठी विशेष रेल्वे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/16/d73a875c0a232e18d86a6748b870486b1710560957519442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : मध्य रेल्वेने होळीनिमित्त (Railway) विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. होळीच्या सणाला (Holi special train) होणारी वाहतूक कमी व्हावी आणि प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे ते दानापूर, गोरखपूर आणि मुझफ्फरपूरसाठी होळी विशेष गाड्या धावणार आहे, हे जाणून घेऊया...
1) पुणे-दानापूर-पुणे (2 ट्रिप)
गाडी क्रमांक 01471 पुणे- दानापूर सुपरफास्ट विशेष गुरुवार दिनांक 21.3.2024 रोजी पुण्याहून 06.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.40 वाजता दानापूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01472 दानापूर - पुणे स्पेशल एक्स्प्रेस शुक्रवार दिनांक 22.3.2024 रोजी दानापूर येथून 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 19.45 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे: हडपसर (फक्त 01471 साठी) दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा
रचना: एकूण 23 आयसीएफ कोच:- एक AC-3 टियर, 20 स्लीपर क्लास, दोन सामान्य द्वितीय श्रेणी यासह एक लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन.
2) पुणे-गोरखपूर-पुणे (2 ट्रीप)
गाडी क्रमांक 01431 पुणे- गोरखपूर सुपरफास्ट विशेष शुक्रवार दिनांक 22.3.2024 रोजी पुण्याहून 16.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 21.00 वाजता गोरखपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01432 गोरखपूर - पुणे सुपरफास्ट विशेष शनिवार दिनांक 23.3.2024 रोजी गोरखपूरहून 23.25 वाजता सुटेल आणि सोमवारी 06.25 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे: दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओरई, कानपूर, लखनौ, बाराबंकी, गोंडा, मानकापूर जंक्शन, बस्ती आणि खलीलाबाद.
रचना: एकूण 23 आयसीएफ कोच:- एक AC-3 टियर, 20 स्लीपर क्लास, दोन सामान्य द्वितीय श्रेणी सह एक लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन.
3) पुणे–मुझफ्फरपूर–पुणे (6 ट्रीप)
गाडी क्रमांक 05290 पुणे- मुझफ्फरपूर सुपरफास्ट एसी विशेष दिनांक 25 मार्च 2024 ते 08 एप्रिल 2024 दरम्यान दर सोमवारी पुण्याहून 06.30 वाजता सुटेल आणि मुझफ्फरपूरला दुसऱ्या दिवशी 15.15 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 05289 मुझफ्फरपूर - पुणे सुपर फास्ट एसी विशेष दिनांक 23 मार्च 2024 ते 06 एप्रिल 2024 दरम्यान दर शनिवारी मुझफ्फरपूर येथून 21.15 वाजता सुटेल आणि पुण्याला सोमवारी 05.35 वाजता पोहोचेल.
थांबे: हडपसर, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलिपुत्र आणि हाजीपूर. एकूण 21 एलएचबी कोच:- 14 एसी-3 टियर, 05 एसी-2 टियर,
दोन पॉवर जनरेटर कार कम गार्ड ब्रेक व्हॅन
आरक्षण: गाड़ी क्रमांक 05290 साठी आरक्षण अगोदरच खुले आहे आणि गाडी क्रमांक 01471आणि 01431 साठी बुकिंग दिनांक 16.03.2024 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल.
विशेष गाड्यांच्या थांबण्याच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry ला भेट द्या. indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)