एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन
ढोल-ताशांच्या गजरात नाचत-गाजत पुणेकरांनी गणपतींना निरोप दिला.
पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, मानाचे पाच गणपती आणि त्याचसोबत सर्व सार्वजनिक गणपतींचं विसर्जन झालं आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.
दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक रात्री उशीरा सुरु झाली आणि आज सकाळी विसर्जन झालं. आपल्या लाडक्या गणपतीचं रुप डोळ्यात साठवण्यासाठी हजारो पुणेकर मिरवणुकीत सहभागी झाले होते.
पुण्यातील मानाच्या गणपतीचं विसर्जन वेळेत पार पाडण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात नाचत-गाजत पुणेकरांनी गणपतींना निरोप दिला.
विसर्जन मिरवणुकीतही वाद
सावर्जनिक गणेशोत्सवाची सुरुवात भाऊ रंगारी की लोकमान्य टिळक यांनी केली यावरुन सुरु झालेल्या वादाचे पडसाद पुण्यातल्या मिरवणुकीत पहायला मिळाले. भाऊ रंगारी मंडळाने महापालिकाचे सन्मान स्विकारला नाही. हा सन्मान न स्वीकारताचा भाऊ रंगारी मंडळाने आपला रथ अलका चौकातून रवाना केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
रत्नागिरी
निवडणूक
निवडणूक
Advertisement