Solapur News: पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात खात्मा; पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल, गुन्हे शाखेची कारवाई
Pune gangster was encountered by the police in Solapur : शाहरुखवर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपून बसला असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती.

Pune gangster was encountered by the police in Solapur: पुणे पोलिसांच्या दप्तरी अनेक गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराचा पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात पुणे पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. सोलापुरातील लांबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेनं कारवाई केली. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय 23) असे या सराईत गुंडाचे नाव आहे. गंभीर अवस्थेत त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल
दरम्यान, पुणे पोलिसांनी खात्मा केलेल्या शाहरुखवर अनेक गुन्ह्यांची नोंद असून तो सराईत गुंड होता. शाहरुखवर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही दिवापासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपून बसला असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्याचा मुसक्या आवळण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्री लांबोटी येथे आले होते. यावेळी पोलिसांनी लपलेल्या घरात छापेमारी केली. छापेमारी करताना आरोपी शाहरुख शेखने पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ अट्टी शेख गंभीर जखमी झाला. यानंतर गंभीर अवस्थेत त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
चार बांगलादेशी नागरिकांना पुण्यातून अटक
दरम्यान, पुण्यात चार बांगलादेशी नागरिकांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. लष्कराच्या गुप्तचर विभाग आणि कोंढवा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. या कारवाईत चार बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले. एका मजूर वसाहतीत हे चारही बांगलादेशी राहत होते. पोलिसांना पाहताच ते पळून जात होते. स्वप्न मोंडल, मिथुन कुमार सांतल, रणधीर मोंडल आणि दिलीप मोंडल अशी या अटक झालेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
























