Pune Ganapati Visarjan : पुण्यात मानाच्या पहिल्या कसबा गणपती आणि दुसऱ्या तांबडी जोगेश्वरीचे विसर्जन
Pune Ganeshotsav 2022 : पुण्यातील मानाच्या दोन गणपतींचे विसर्जन डेक्कन येथे विसर्जन करण्यात आलं. त्यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं.
![Pune Ganapati Visarjan : पुण्यात मानाच्या पहिल्या कसबा गणपती आणि दुसऱ्या तांबडी जोगेश्वरीचे विसर्जन Pune Ganapati Visarjan 2022 Kasba Ganapati and Tambadi Jogeshwari Pune Ganeshotsav 2022 Pune Ganapati Visarjan : पुण्यात मानाच्या पहिल्या कसबा गणपती आणि दुसऱ्या तांबडी जोगेश्वरीचे विसर्जन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/64f3cbc52d87ced527c0363cc5e7998e166272547700193_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्याच्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं आणि मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन मोठ्या भक्तीमय वातावरणात करण्यात आलं आहे. आज संध्याकाळी 4.15 वाजता कसबा गणपतीचं विसर्जन करण्यात आलं आहे. त्यानंतर मानाच्या दुसऱ्या म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणेशाचं विसर्जन 5.40 वाजता करण्यात आलं. यावेळी लेझिम अन् ढोल-ताशाच्या गजरात अवघं पुणे दुमदुमल्याचं दिसून आलं.
पुणे पालिकेने बांधलेल्या डेक्कन येथील हौदात या मानाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात येत आहे. पुण्यातील मानाचे समजले जाणारे पाच गणपती मंडळ म्हणजे श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती. या गणपतींच्या विसर्जनाचा कार्यक्रम क्रमाने आखण्यात आला आहे.
पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जनाची मिरवणूक सकाळी 11.20 वाजता सुरू झाली. बेलबाग चौकातून सुरू झालेली ही विसर्जनाची मिरवणूक नंतर लक्ष्मी रोड, अलका टॉकीज आणि डेक्कन अशी झाली. बेलबाग चौकात 11.20 वाजता सुरू झालेली मिरवणूक ही अलका चौकात 3.15 मिनीटांनी आली. त्यानंतर डेक्कन या ठिकाणी 4.15 वाजता विसर्जन करण्यात आलं.
मानाच्या गणपतीचे विसर्जन वेळ
कसबा गणपती
बेलबाग चौक - 11:20
अलका चौक - 3:15
विसर्जन - 4:15
तांबडी जोगेश्वरी
बेलबाग चौक - 11:55
अलका चौक - 4:45
विसर्जन - 5:38
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)