एक्स्प्लोर
VIDEO: दहीहंडीची वर्गणी नाकारल्यानं बेकरी कर्मचाऱ्यांना उठाबशांची शिक्षा

पुणे: पुण्यातील भोसरीमध्या स्वयंघोषित कार्यकर्त्यांनी गोविंदांची दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून बेकरीच्या कर्मचाऱ्यांकडून दमदाटीनं उठाबशा काढून घेण्याचा प्रकार भर रस्त्यात घडला आहे. उठाबाश काढत असतानाचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. रस्त्यावर बेकरीतील कर्मचाऱ्यांना उठाबशा काढायला लावाणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवेश बघता कुणीही त्यांना रोखण्यासाठी पुढे आलं नाही. दरम्यान हा प्रकार १५ ऑगस्टला आळंदी रस्त्यावरच्या एका बेकरीच्या दुकानात घडला असल्याचं समजतं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झालेला असला तरी अद्याप याप्रकरणी पोलिसात कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. VIDEO:
आणखी वाचा























