एक्स्प्लोर

डीएसके डेव्हलपर्सच्या एमडीपदावरुन डीएस कुलकर्णी पायउतार

डी. एस. कुलकर्णींनी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक, सीईओपदाचा राजीनामा दिला असला तरी ते अकार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील.

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णीं यांनी डीएस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारीपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. डी. एस. कुलकर्णींनी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक, सीईओपदाचा राजीनामा दिला असला तरी ते अकार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील. डीएस कुलकर्णींच्या जागी त्यांचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय कंपनीच्या संचालकपदी शशांक मुखर्जी यांची नेमणूक करण्यात आली आहे. गुरुवारी डीएसकेडीएल या कंपनीच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याविषयी कालच मुंबई आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला कळवण्यात आलं. गुंतवणूकदारांचे पैसे अडवल्यानं तसंच कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्यानं गेल्या काही दिवसांपासून डीएसके वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. डी. एस. कुलकर्णी यांच्या DSK ग्रुपनं 1200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री, अर्थ मंत्रालय आणि PF आयुक्तांकडे तक्रार केली होती. तसंच यासंबंधी कारवाई करण्याची मागणीही सोमय्यांनी केली होती. काय आहे नेमकं प्रकरण? गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आली आहे. यामुळे गुंतवणुकदार गोत्यात आले आहेत. यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी अर्थात डीएसके आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहेत. मध्यमवर्गीयांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळवून देणारा बिल्डर म्हणून डीएसकेंनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. पण आता गुंतवणुकदारांची अडचण झाली आहे. डीएसकेंकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्यानं लोक त्यांच्या कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत. २०१४ पासून अनेकांनी घरं बूक केलं आहे. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. २०१४ पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हापासून गाडी रुळावरुन घसरली. स्वप्नवत वाटणाऱ्या या ड्रीम सिटीत काय नव्हतं, कृत्रिम नद्या, त्यातून सर्व शहराला जोडणारी जलवाहतूक. कल्पनेच्या पलिकडचं विश्व साकारण्याची डीएसकेंची इच्छा होती. या प्रोजेक्टसाठी त्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगत तीनशे एकर जागा निवडली. १९ डिसेंबर २०१४ला या योजनेचा थाटात शुभारंभ केला. सर्व सुखसोयींनी संपन्न असणाऱ्या वनबीएचके फ्लॅटची किंमत तब्बल 70 लाखांपेक्षा जास्त होती. स्वप्नवत वाटणाऱ्या हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी डीएसकेंनी आपली सारी आर्थिक ताकद पणाला लावली. इतर व्यवसायातून येणारी सर्व आर्थिक रसद त्यांनी ड्रीम सिटीकडे वळवली. शेअर बाजारातूनही पैसा उभा केला. मात्र या प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी करताना डीएसकेंनी पत्नी आणि नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहोचवल्याचा आरोप होतो आहे. अशाप्रकारे डीएसकेंनी लोकांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. लोकांकडून आणखी पैसे कर्जरुपात घेण्यासाठी डीएसकेंनी आकर्षक योजनांची सुरुवात केली. ठेवींवर १२ टक्के व्याज देण्याचं आश्वासन दिलं. परिणामी हजारो लोकांनी लाखो रुपये डीएसकेंकडे गुंतवले. सुरुवातीला काही महिने लोकांना व्याज मिळालं. पण आर्थिक चणचण जाणू लागल्यानंतर लोकांना पैसे परत करणं डीएसकेंसाठी कठीण होत गेलं. मग ठेवीदार डीएसकेंच्या कार्यालयात फेऱ्या मारु लागले. त्यातून मार्ग काढण्यासाठी डीएसकेंनी इतर व्यवसायातील पैसा बांधकाम व्यवसायाकडे वळवला. मात्र, त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिकट बनली डीएसकेंच्या वीसहून अधिक कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांचे पगारही थकले आहेत. स्वतः डीएसके आणि त्यांच्या पत्नी ही परिस्थिती मान्य करतात. मात्र सगळं खापर नशिबावर फोडतात. आर्थिक मंदी आणि नोटबंदीमुळे अनेक उद्योगांचं कंबरडं मोडलं आहे. आपणही त्यामुळेच अडचणीत आल्याचा दावा डीएसके करत आहेत.

संबंधित बातम्या :

डीएसकेंचा 1200 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप

डीएसकेंच्या अडचणीत वाढ, गुंतवणूकदारांकडून पोलिसात तक्रार

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्टSupreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टाकडून 'हजामत'ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी अँब्युल्स केजऐवजी कळंबकडे नेली, ग्रामस्थांचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.