एक्स्प्लोर

Pune Crime : गॅस वितरकाचा नंबर गुगलवर शोधला अन् फोन केला; कस्टमर केअरचा सल्ला पडला सहा लाखांना

गॅस वितरक म्हणून गूगलवर आलेल्या नंबरवर फोन (Pune Cyber Crime News) करुन सल्ला घेतलेल्या माहिलेला सायबर चोरट्यांनी 5 लाख 73 हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

Pune Cyber Crime : गॅस वितरक म्हणून गूगलवर आलेल्या नंबरवर फोन (Pune Cyber Crime News) करुन सल्ला घेतलेल्या माहिलेला सायबर चोरट्यांनी 5 लाख 73 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. गॅस संपल्यानंतर नवीन सिलेंडरला रेग्युलेटर अनेकदा बसत नाही. तेव्हा गॅस सिलेंडर वितरकाला फोन करतो, त्यांचा माणूस येऊन बसवून देतो. पण एका ज्येष्ठ नागरिक महिलेने एच पी कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर गूगलला सर्च केला. त्याने दिलेल्या सल्ल्यानुसार प्रोसेस केली. त्याचवेळी सायबर चोरट्यांनी त्यांना गंडा घालता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी भांडारकर रोडवर राहणार्‍या एका 64 वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 4 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता घडला. फिर्यादी यांच्या घरातील गॅस सकाळी संपला. नवीन सिलेंडरला रेग्युलेटर बसत नव्हता. त्यामुळे त्यांनी गुगलवर एच पी कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर सर्च करुन त्यावर संपर्क केला. त्याला रेग्युलेटरबाबत सांगितल्याने त्याने मोबाईलवर क्वीक हेल्प अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यामध्ये त्यांना सर्व माहिती भरायला सांगितली. त्याप्रमाणे त्यांनी बँकेसह सर्व माहिती भरली. त्यानंतर त्यांना त्या चोरट्याने 25 रुपये पाठविण्यास सांगितले. ते पैसे पाठविल्यावर तंत्रज्ञ येऊन तुम्हाला काम करुन देईन, काही पैसे असेल तर ते सांगेल, असे सायबर चोरट्याने सांगितले.

तुम्हाला एच पीची 25 रुपयांची पावती मिळेल, असे सांगितल्यावर त्यांनी त्यांनी एकीकडे फोनवर बोलत असतानाच 25 रुपये ट्रान्सफर केले. त्या त्यांच्या मोबाईलवर सलग मेसेज येण्यास सुरुवात झाली. त्यावेळी त्यांना फसवणूक होत असल्याचं समजलं. त्यांनी तातडीने बँकेला फोन करुन बँक खाते गोठविण्यास सांगितलं. तोपर्यंत सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून 5 लाख 73  हजार 807रुपये काढून घेत संपूर्ण खाते रिकामे केले होते.

यापूर्वी पुण्यातील 71 वर्षीय वृद्धाची तब्बल 35 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. लाईफ इन्शुरन्सच्या नावाखाली सायबर चोरांनी म्हाडामध्ये काम करणाऱ्या एका निवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. फसवणूक करुन 35 लाख दिल्ली, नोएडामधील विविध 12 बँक अकाऊंटमध्ये त्यांचे पैसे जमा झाले होते. या ज्येष्ठ नागरिकाला दीड वर्षांपूर्वी "लाईफ इन्शुरन्स" घ्या आणि त्यावर चांगला परतावा मिळेल, असं आमिष दाखवलं. यासाठी फक्त प्री इंस्टॉलमेंट फी भरावी लागेल, असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना वेगवेगळ्या बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर करायला सांगितले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
Embed widget