एक्स्प्लोर

Pune Crime News : जमिनीच्या वादातून जमिनीत गाडण्याचा प्रयत्न; 22 वर्षीय तरुणीचा गंभीर आरोप, राजगड तालुक्यातील घटना

पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोंढवळे गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित तरुणीने केला आहे.

पुणे : जमिनीच्या वादातून अनेक प्रकार घडल्याचं आपण (Pune Crime News) पाहिलं आहे. अनेकदा एकमेकांच्या हत्या केल्याचंदेखील आपण पाहिलं आहे. मात्र आता पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोंढवळे गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित तरुणीने केला आहे. यामुळे कोंढवळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. 

ट्रॅक्टर आणि जेसीबी घेऊन दावा न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीचा बेकायदेशीर पध्दतीने ताबा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी हे सगळं पाहत असलेल्या तरुणीच्या अंगावर थेट माती टाकण्याचा प्रयत्न केला. साधारण 25 ते 30 जण आले आणि थेट तिच्या अंगावर माती टाकली. यावेळी तिला गाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असा आरोप तरुणीने आणि तिच्या घरच्यांनी केला आहे. 

तरुणीने आरोप केलेले संबंधित नागरिक पोलिसांसह जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले असताना, तरुणी आणि त्या नागरिकांमध्ये झालेल्या वादा दरम्यान ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत साधारण कंबरेपर्यंत मातीमध्ये तरुणी गाडल्या गेल्याचं दिसत आहे. संबंधित तरुणीने हा प्रकार घडल्यानंतर तिच्या घरच्यांना सांगितला आणि त्यानंतर घरातील सगळ्यांनी या घटनेसंदर्भात वेल्हे पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. मात्र या संदर्भात अजून कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नाही आहे. घडलेल्या या प्रकरणाती पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे मात्र गुन्ह्याची कारवाई करण्यात आली नाही. ही कारवाई कोणाच्या दबाबातून करण्यात येत नाही का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

घडलेली ही घटना अत्यंत वाईट असून या घटनेची संपूर्ण माहिती घेऊन योग्य कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आतापर्यंत अनेकदा असे वाद आपण पाहिले आहेत भावकीत असे अनेक वाद ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात देखील होतात. एकमेकांची हत्या करण्यापर्यंत हे वाद टोकाला जातात. मात्र तरीही यासंदर्भात ठोस अशी शिक्षा झालेली फार कमी वेळा दिसते. त्यामुळे असे प्रकार कधी थांबतील. जमिनीचे वादातून होणाऱ्या हत्या आणि गुन्हेकधी थांबतील, असा प्रश्न निरुत्तरीत आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Exclusive : राज्यात पब आणि बारमध्ये 7 कठोर नियम लागू होणार, थोड्याचवेळात घोषणा; रात्री किती वाजेपर्यंत बार सुरु राहणार?

Maharashtra Loksabha Election 2024: महाराष्ट्रात महायुतीच ठरणार वरचढ? निकालापूर्वीच राजकीय विश्लेषकानं वर्तवलं मोठं भाकीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
Sadanand Chavan : भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जाणून घ्या पात्रतेचे निकष आणि कागदपत्रं
या गोष्टी तपासून घ्या, अन्यथा तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ठराल अपात्र
Rahul Gandhi : स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा हिंसा, नफरत नफरत करतात, राहुल गांधी यांचं वक्तव्य,मोदी म्हणाले हे गंभीर....
राहुल गांधी यांचं एक वक्तव्य अन् लोकसभेत सत्ताधारी विरोधक आक्रमक, मोदींनी म्हटलं हे गंभीर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar Nagpur : दीक्षाभूमी परिसरातील पार्किंगचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर म्हणतात..Rahul Gandhi vs Amit Shah : अग्निवीर योजनेवरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक ABP MajhaSachin kharat On Deekshabhoomi :  दीक्षाभूमीत अंडरग्राऊंड पार्किंग होणं अत्यंत चुकीचं : सचिन खरातAmbadas Danve : लोकशाहीचा गळा सातत्याने घोटला जातोय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
Sadanand Chavan : भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जाणून घ्या पात्रतेचे निकष आणि कागदपत्रं
या गोष्टी तपासून घ्या, अन्यथा तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ठराल अपात्र
Rahul Gandhi : स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा हिंसा, नफरत नफरत करतात, राहुल गांधी यांचं वक्तव्य,मोदी म्हणाले हे गंभीर....
राहुल गांधी यांचं एक वक्तव्य अन् लोकसभेत सत्ताधारी विरोधक आक्रमक, मोदींनी म्हटलं हे गंभीर
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?
तोच दिवस, तीच पद्धत... 6 वर्षांनी दिल्लीतील बुराडीप्रमाणेच मध्य प्रदेशात हादरवणारं दृश्य, आढळले 5 मृतदेह
तोच दिवस, तीच पद्धत... 6 वर्षांनी दिल्लीतील बुराडीप्रमाणेच घरात आढळले लटकलेले संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह
Zika Virus:  पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
Telly Masala : टीम इंडियासाठी आयुष्यमानची खास कविता ते शालूचं जमलं? राजेश्वरीच्या रिलेशनशीपची चर्चा ; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
टीम इंडियासाठी आयुष्यमानची खास कविता ते शालूचं जमलं? राजेश्वरीच्या रिलेशनशीपची चर्चा ; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Embed widget