Pune Crime News : प्रेयसीच्या मित्राच्या अंगावर प्रियकराने चार चाकी चढवली; पोलिसांनी सांगितलं कारण...
आपली प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत आहे याचा राग मनात धरून एका प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या मित्राच्या अंगावर चार चाकी वाहन चालवून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला आहे.
![Pune Crime News : प्रेयसीच्या मित्राच्या अंगावर प्रियकराने चार चाकी चढवली; पोलिसांनी सांगितलं कारण... Pune Crime News The boyfriend put a four-wheeler on the body of his girlfriend friend In pcmc Crime news Pune Crime News : प्रेयसीच्या मित्राच्या अंगावर प्रियकराने चार चाकी चढवली; पोलिसांनी सांगितलं कारण...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/28/44cc5b99578e30ad9275d96eb83979d21716895406714442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : आपली प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत आहे याचा राग मनात धरून एका प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या मित्राच्या अंगावर चार चाकी वाहन चालवून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. पिंपरी चिंचवड शहरात काल मध्य रात्री यशवंत नगर येथील शंकर चौधरी चौक परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये सदरील मुलगा हा गंभिर जखमी झाला असून त्याच्यावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय सी एम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सुशील काळे असे अंगावर चारचाकी गाडी घालणाऱ्या माथेफिरू तरुणाचे नाव असून या अपघातात निलेश शिंदे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
आपली प्रेयसी निलेश शिंदे या तरुणासोबत बोलत थांबल्याचे पाहून राग अनावर झाल्याने सुशील काळेने आपली चार चाकी किया गाडी निलेश शिंदे यांच्या अंगावर घालून त्याला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी आरोपी सुशील काळे यांच्या विरोधात भा द वी 307 कलामअंतर्गत खूनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी सांगितलं आहे.
ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास टेल्को रोड यशवंत नगर या ठिकाणी घडलेली आहे. निलेश शिंदे आणि सुशील काळे याची गर्लफ्रेंड एकच आहे. सध्या त्या युवतीचे सुशील काळे सोबत प्रेमसंबंध असून ती निलेश पासून दूर झालेली आहे. निलेश या तिला त्रास देत होत असत त्या प्रेयसीच म्हणणं आहे. रात्री उशिरा एक्स बॉय फ्रेंड निलेश हा युवतीला भेटायला आला होता. याबाबतची माहिती तरुणीने सुशीलला दिली. निलेश जेव्हा भेटायला आला तो युवतीशी बोलत होता त्यावेळी सुशीलने चारचाकी गाडीने निलेशला उडवलं. यात तो गंभीर जखमी झाला.
पुण्यात मागील काही दिवसांपासून बळजबरी करुन किंवा क्षृल्लक कारणावरुन अनेक राडे होताना पाहायला मिळत आहे. कधी माझ्याकडे डोळे वर करुन का पाहिलं तर कधी मी भाई आहे मला भाई म्हण, म्हणत एकमेकांवर कोयते हल्ले करताना दिसत आहेत. यातच प्रेम प्रकरणातूनदेखील अनेक राडे होताना पाहायला मिळतात. त्यातच आता एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला म्हणून प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली आहे. यात एक्स ब़ॉयफ्रेंड जखमी झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)