एक्स्प्लोर

Pune Crime News : कारागृहातही गुंडेशाही सुरुच! आंदेकर टोळीतील आरोपींकडून कारागृह अधिकाऱ्याला मारहाण

येरवडा कारागृहातील आरोपींनी कारागृहातील अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. येरवडा कारागृहातील मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याचं पठाण असं नाव आहे.

पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. त्यातच पुण्यातील  (Yerawada Jail ) टोळी युद्ध अनेकांना सर्वश्रृत आहे. यातच आहा गुन्हेगारांना पोलिसांनी किंवा अधिकाऱ्यांची भीतीच उरली नसल्याचं शहरात घडलेल्या घटनांमधून दिसून येत आहे. त्यातच आता थेट आरोपींनी येरवडा कारागृहातील अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. येरवडा कारागृहातील मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याचं शेरखान पठाण असं नाव आहे.

येरवडा कारागृहात असलेल्या कुख्यात आंदेकर टोळीतील आरोपींनी कारागृह अधिकाऱ्याला येरवडा कारागृहातील मोकळ्या मैदानात मारहाण केली आहे.  गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पठाण यांच्यावर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने हल्ला केला. त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यामुळे  येरवडा कारागृहात काही प्रमाणात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन दिवसांपूर्वी दहा ते बारा कैद्यांमध्ये आणि शेरखान पठाण यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. येरवडा कारागृहाती इतर अधिकारी या घटनेची माहिती घेत आहेत. आरोपींनी मारहाण केल्याने पठाण गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींनी पठाण यांना शिवीगाळ केली. त्यावरुन ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र संपूर्ण चौकशी केल्यानंतर पठाण यांना मारहाणीचं खरं कारण समोर येईल. येरवडा कारागृहात पोलीस दाखल झाले आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे. 

अधिकाऱ्याच्या डोळ्याखाली जखम, हात फ्रॅक्चर 

 मारहाण करणारे आरोपी हे पुण्यातील कुख्यात टोळी असलेले आंदेकर टोळीतील आहेत. विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे अशी आरोपींची नावं आहे. दोघेही मागील काही वर्षांपासून अनेक गुन्ह्यांमुळे शिक्षा भोसत आहेत. या दोघांनी इतर 10 कैद्यांना सोबत घेतलं आणि थेट पठाण यांना मारहाण करायला सुरुवात केली. हे पाहताच कारागृहातील बाकी अधिकारी जमा झाले. या मारहाणीत पठाण यांच्याउजव्या डोळ्याच्या खाली जखम झाली आहे. तसेच उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे

अधिकारीच असुरक्षित 

पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत आहे. त्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. मात्र अशा घटनांमुळे कारागृह अधिकारीच असुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या आहेत. त्यात मोहोळ, आंदोकर या टोळ्या मोठ्या आणि किरकोळ गुन्ह्यांसाठी ओळखल्या जातात. त्यातील आंदेकर टोळीवर खून, खुनाचे प्रयत्‍न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे, अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
Lok Sabha Election Voting Maharashtra : राज्यात सुरुवातीच्या टप्प्यात नंदुरबारची आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
नंदुरबारची सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
Raksha Khadse : मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Anna Hajare Ralegan Voting  : चारित्र्य बघून मतदान करा, अण्णा हजारेंचं मतदारांना आवाहनBajrang Sonwane On oppenent : विरोधकांकडून पैसै वाटले जातात, बजरंग सोनावणेंचा आरोपABP Majha Headlines : 10 AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  9  AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
Lok Sabha Election Voting Maharashtra : राज्यात सुरुवातीच्या टप्प्यात नंदुरबारची आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
नंदुरबारची सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
Raksha Khadse : मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
Monday Motivation : सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Embed widget