Pune Crime News : परिचारीकेचे अंघोळ करताना चित्रिकरण; पुण्यातील IB गेस्ट हाऊसमधील धक्कादायक प्रकार
Pune Crime News : ‘आयबी गेस्ट हाऊस’मध्ये राहत असणाऱ्या परिचारीकेचे आंघोळ करतानाचे फोटो व व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Pune Crime News : पुण्यातील ‘आयबी गेस्ट हाऊस’मध्ये (ib guest house pune) राहत असणाऱ्या परिचारीकेचे आंघोळ करतानाचे फोटो व व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील सुरक्षारक्षकानेच हे फोटो काढल्याचे समोर आले असून, त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत 36 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात (bund garden police station) तक्रार दिली आहे. बंडगार्डन पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो सुरक्षारक्षक आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव अशोक तुकाराम चव्हाण असे आहे. रविवारी मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी सकाळी महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.
तक्रारदार महिला या एका नामांकित सरकारी रुग्णालयात परिचारीका म्हणून कर्तव्यावर आहेत. त्या सध्या कोरोना ड्यूटीवर असल्याने त्यांची आयबी गेस्ट हाऊस (ib guest house pune) येथे राहण्याची सोय करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री त्या कामावरून गेस्ट हाऊसमध्ये आल्या. कोरोना ड्यूटी (covid duty) केली असल्याने त्या आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेल्या. यादरम्यान ड्यूटीवर असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांच्या बाथरूमच्या खिडकीजवळ येत त्यांचे आंघोळ करतानाचे फोटो काढले. त्यांना याबाबत शंका आली. त्यामुळे त्यांनी तात्काळ बाहेर येऊन पाहणी केली. मात्र, त्यांना कुणी मिळून आले नाही. सकाळी त्यांनी बंडगार्डन पोलीसांकडे तक्रार केली होती.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महिलेनं दिलेल्या तक्रारीची गांर्भियाने दखल घेत तपासाच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) तपासले. त्यात सुरक्षारक्षक हा प्रकार करत असताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चित्रीकरण केल्याची कबूली दिली. त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
संबधिंत बातम्या :
Pune Crime : पुणे हादरले; मित्राने 16 वर्षीय मुलासोबत केलं अनैसर्गिक कृत्य
पुणे: रिक्षा दरवाढीचा मीटर फास्ट; प्रवासासाठी मोजावे लागणार 'एवढे' रुपये!