Pune Crime: दारु पिऊन मारणाऱ्या नवऱ्याला पंगू करुन जागेवर बसवायचं होतं, पण प्रियकराचा फावड्याचा घाव वर्मी बसला अन्... लोणी काळभोर हादरलं
Pune Crime: रवींद्र झोपेत असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास डोक्यात फावड्याच्या दांडक्याने वार करून त्यांचा खून करण्यात आला आहे.

पुणे: पुण्यातील लोणी काळभोर परिसरात अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने आणि प्रियकराने निर्घृणपणे खून केला आहे (pune Crime News). रवींद्र काशीनाथ काळभोर (वय 45, रा. रायवाडी रोड, वडाळेवस्ती, लोणी काळभोर) असे खून झालेल्याचे नाव आहे. रवींद्र झोपेत असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास डोक्यात फावड्याच्या दांडक्याने वार करून त्यांचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत गुन्ह्याचा तपास (pune Crime News). करत पत्नी शोभा रवींद्र काळभोर (वय 42), गोरख त्रिंबक काळभोर (वय 41, रा. वडाळेवस्ती, लोणी काळभोर) या दोघांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 11) मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.(pune Crime News).
गोरख आणि शोभा या दोघांचे अनैतिक संबंधांची पत्नीला माहिती
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोरख आणि शोभा या दोघांचे अनैतिक संबंध आहेत आणि याची माहिती रवींद्र यांना होती. त्यातूनच रवींद्र आणि शोभा या दोघांमध्ये वाद होत होते. मद्यप्राशन करून रवींद्र सतत शोभाला मारहाण करत होता. त्यामुळे गोरख देखील रवींद्रवर चिडून होता. शनिवारी (दि. 29) शोभा आणि रवींद्र या दोघांत वाद झाला होता. त्या वेळी शोभा आपल्या मुलांना घेऊन माहेरी थेऊर गावी निघून गेली. रवींद्रकडून सतत होणाऱ्या त्रासाला शोभा देखील वैतागली होती. त्यामुळे प्रियकर गोरख आणि शोभा या दोघांनी रवींद्रचा बंदोबस्त करण्याचं ठरवलं, आणि गेम केला.
शोभा आणि गोरख यांना सुरुवातीला रवींद्र यांचा खून करायचा नव्हता. काहीतरी इजा करून एका जागेवर बसवायचे होते. परंतु, गोरख याने रवींद्र यांना कायमचं आपल्या वाटेतून दूर केलं. रवींद्र झोपेत असताना डोक्यात फावड्याच्या दांडक्याने जोरात वार केले. घाव वर्मी लागल्याने रवींद्र यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गोरख याने घटनास्थळावरून पळ काढला.
कट असा रचला अन् तो
रवींद्र आणि गोरख एकाच गावातील राहणारे, बांधाला बांध आणि जवळच घरं. दोघांच्या घरामध्ये शंभर मीटरचे अंतर, तर शेती बांधाला बांध लागूनच होती. गोरखचे रवींद्र यांच्या घरी सतत येणे-जाणे असायचे. दोघांनी एकत्र चारचाकी गाडी देखील खरेदी केली होती. तर गोरख याने साडेतीन लाख रुपये रवींद्र यांना वापरासाठी दिले आहेत. रवींद्र यांना दारूचे व्यसन होते. अनेकदा गोरख त्यांना दारू पाजत असे. शोभा आणि गोरख याने आखलेल्या योजनेप्रमाणे काम केले. शोभा थेऊरला गेल्यामुळे रवींद्र सोमवारी (दि.31) एकटेच घरी होते. त्या दिवशी त्यांनी मद्य प्राशन केले होते. गोरख हा त्यांच्यासाठी जेवण घेऊन आला. त्यानंतर रवींद्र अकराच्या सुमारास घराबाहेर झोपलेले होते, मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास गोरख त्यांच्या घरी आला. त्याने रवींद्र झोपेत असताना डोक्यात फावड्याच्या दांडक्याने जोरात वार केले. घाव वर्मी लागल्याने रवींद्र यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गोरख याने पळ काढला होता.
नेमकं प्रकरण काय?
पुणे शहरातील लोणी काळभोर परिसरातील वडाळे वस्ती परिसरात राहणारे रवींद्र काळभोर हे सोमवारी रात्री 11च्या सुमारास नेहमीप्रमाणे घराबाहेर पलंगावर झोपले होते. मात्र पहाटेच्या सुमारास त्यांच्या डोक्यात दगडाने आणि लाकडी दांडक्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. सकाळी रवींद्र हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती घेत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासाला सुरुवात झाली. यानंतर अवघ्या तीन तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी याप्रकरणी रवींद्र यांची पत्नी शोभा रवींद्र काळभोर (42) आणि गोरख त्रंबक काळभोर (41) यांना अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहितीही समोर आली.
रवींद्र काळभोर यांच्या हत्येनंतर पोलिसांनी आजूबाजूला, तसेच शेजाऱ्यांकडे याबद्दलची चौकशी केली. यावेळी पोलिसांना रवींद्र यांची पत्नी शोभा आणि गोरख यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई त्या दोघांकडे वळली. यानंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यावेळी सुरुवातीला त्या दोघांनीही व्यवस्थित उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्हा कबूल केला.























