एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pune Crime News : दोन महिने उत्पादन शुल्क विभागाची धडाधड छापेमारी; अवैध दारूसह सुमारे 2 कोटी 82लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने मोहीम हाती घेतली. गेल्या दोन महिन्यात 2 कोटीचा मुद्देमाल जप्त केला

पुणे : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने अवैध दारू (PUNE CRIME)  निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा (liquor) घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून गेल्या दोन महिन्यात 2 कोटी 81 लाख 91 हजार 349रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने 1 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत छापे टाकत 426 वारस गुन्ह्यांची नोंद व 411 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 20 हजार 675 लिटर गावठी हातभट्टी दारू, 761 लिटर देशी मद्य, 18 हजार 295 लिटर विदेशी मद्य, 138 लिटर बिअर व 1 हजार 823 लिटर ताडीसह 36 वाहने असा 2 कोटी 81 लाख 91 हजार 349 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 93 अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या व सराईत आरोपी विरूद्ध चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्रासाठी दाखल 442 प्रस्तावांपैकी 248 जणांचे बंधपत्र घेण्यात आले असून 97 लाख 71 हजार रुपये बंधपत्राची रक्कम घेण्यात आली आहे. बंधपत्र घेतल्यानंतर 41 प्रकरणांत नियमाचे उल्लंघन निदर्शनास आले. 

1 एप्रिल 2023 ते 31  जानेवारी 2024 या कालावधीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्या विरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाई करून 202 गुन्हे नोंदवले. त्यामधील 468 आरोपीना अटक करुन  न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 170 आरोपींना दोषी ठरविले असून या आरोपींना 5 लाख 83 हजार 100 रूपये इतका द्रव्य दंड ठोठविला आहे. यामुळे अवैध मद्य विक्री करणाऱ्यांसोबतच अवैध ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांनाही चाप बसणार आहे.

अवैध मद्य व्यवसायात गुंतल्याबद्दल वारंवार गुन्हे नोंदविलेले तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करुनही वर्तणुकीत बदल झाला नाही अशा आरोपीविरूद्ध एम.पी.डी.ए कायदा 1981 अंतर्गत पोलीस कारवाई करण्यात येते. यामध्ये दाखल 48 प्रकरणात पोलीस आयुक्तालयाकडून कारवाई करून 10  आरोपी विरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. परवानाकक्षा नमुना एफएल-3 अनुज्ञप्तीविरुद्ध एकूण 249 नियमभंग प्रकरणे, त्यापैकी 3 निलंबन संख्या व 44 लाख 90 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

कारवाईसाठी 14 नियमित आणि 3  विशेष पथके तयार

आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री तसेच परराज्यातील मद्य, अवैध ताडी आदींची विक्री, अवैध ढाब्यांवर मद्याची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने एकूण 14 नियमित व 3 विशेष पथके तयार केली ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. तसेच रात्रीची गस्त घालण्यात येणार आहे. राज्याचा महसूल चुकवून परराज्यातून येणाऱ्या मद्य साठ्यावर तसेच किरकोळ अनुज्ञप्तीचे व्यवहार विहीत वेळत चालू नसल्यास व काहीही आक्षेपार्ह आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News :  40 हजारात एक लाखांच्या बनावट नोटा; 500च्या दोन नोटा अन् बाकी वह्यांचं बंडल; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटांच्या छापखान्याचा भांडाफोड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 2100 यंदा नाही तरी पुढील वर्षी..?Solapur Election News : EVM वर आक्षेप, बॅलेट पेपरवर निवडणूक घेणाऱ्या मारकडवाडीमध्ये जमावबंदीचे आदेश लागूABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 02 December 2024Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 3 PM : 02 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
Rishabh Pant And Shreyas Iyer Qualification : IPL इतिहासातील सर्वात महागडे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर कितवीपर्यंत शिकले?
IPL इतिहासातील सर्वात महागडे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर कितवीपर्यंत शिकले?
Chhagan Bhujbal : खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
Suryakumar Yadav And Devisha Shetty Love Story : आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
Embed widget